Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Digambar Kamat: '..तर युवकसुद्धा कृषी क्षेत्राकडे आकर्षित होतील'! आमदार कामत यांनी शेतकऱ्यांच्या भूमिकेबद्दल मांडले मत

Goa News: कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी लहान शेतकऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्‍वपूर्ण असते. या लहान शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य मिळाले तर युवकसुद्धा या क्षेत्राकडे आकर्षित होऊ शकेल, असे प्रतिपादन माजी मुख्‍यमंत्री तथा मडगावचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी लहान शेतकऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्‍वपूर्ण असते. या लहान शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य मिळाले तर युवकसुद्धा या क्षेत्राकडे आकर्षित होऊ शकेल, असे प्रतिपादन माजी मुख्‍यमंत्री तथा मडगावचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांनी केले.

कृषी खात्याने केंद्र सरकारच्या परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत मडगावात कृषी यार्डमध्ये आयोजित केलेल्या खरेदी व विक्री प्रदर्शनाचे उद्‌घाटन केल्यानंतर कामत बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, नगरसेविका दीपाली सावळ, कृषी विज्ञान केंद्राचे संयोजक शिवराम नाईक गावकर, जिल्हा अधिकारी राजेश देसाई व मान्यवर उपस्थित होते.

लहान शेतकऱ्यांच्‍या उत्पादनात वाढ कशी होऊ शकेल यासाठी विचार व प्रयत्न करणे गरजेचे आहे. हा सेंद्रिय शेतीचा काळ आहे. लोक आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत लहान शेतकऱ्यांची भूमिका महत्त्‍वाची आहे. या शेतकऱ्यांना मार्केट मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. आशा प्रकारचे खरेदी व विक्री प्रदर्शन वर्षातून एकदा नव्हे तर नियमित व्हायला हवे, असेही कामत म्‍हणाले. कृषी खात्याचे उपसंचालक किशोर भावे यांनी सांगितले की खरेदीदार व विक्रेता यांच्यामधील जो मध्यस्थ असतो, ती प्रथा नष्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

एकूण १० हजार हेक्टर जमिनीत उत्पादन

केंद्र सरकारच्या कृषी विकास योजनेअंतर्गत ५०० क्लस्टर्सची निवड केली आहे. प्रत्येक क्लस्टरसाठी २० हेक्टर जमीन विभागण्यात आली आहे. त्यामुळे एकूण दहा हजार हेक्टर जमिनीत या योजनेखाली कृषी उत्पादन घेतले जात असल्याचे कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई यांनी सांगितले. सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन टप्‍प्‍यांत अनुदान दिले जाते. पहिल्या वर्षी १२ हजार रुपये, दुसऱ्या वर्षी १० हजार तर तिसऱ्या वर्षी ९ हजार रुपये देण्यात येतात, अशी माहितीही त्यांनी दिली.

प्रदर्शनात थाटले एकूण ६० स्‍टॉल्‍स

सदर प्रदर्शनात एकूण ६० स्टॉल्‍स आहेत. त्यात तांदूळ, भाजी-पाला, फळे, नारळ, तेल व इतर कृषी उत्पादने विक्रीसाठी ठेवण्‍यात आली आहेत. त्‍यात ग्रामीण भागातून आलेल्या लहान शेतकऱ्यांचा सहभाग आहे.

शेतकऱ्यांसाठी ४७ योजना कार्यरत : कृषी संचालक संदीप फळदेसाई

गोव्यात कृषी क्षेत्राला मोठी उभारी मिळू लागली आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांसाठी एकूण ४७ योजना कार्यरत आहेत व त्याचा लाभ राज्‍यातील शेतकरी घेत आहेत. या योजनांमध्ये ३४ राज्य सरकारच्या, ११ केंद्र सरकारच्या व दोन केंद्र सरकारने अनुदानित केलेल्या योजनांचा समावेश आहे, असे कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

SCROLL FOR NEXT