Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

'डॉ. फ्रान्सिस गोम्स यांचा आदर्श घ्यावा' मंत्री दिगंबर कामत यांचे विद्यार्थी, तरुणांना आवाहन

विद्यार्थ्यांनी डॉ. फ्रान्सिस लुईस गोम्स यांचा आदर्श घेऊन पुढे जावे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी केले

Akshata Chhatre

सासष्टी: डॉ. फ्रान्सिस लुईस गोम्स हे थोर विचारवंत, देशभक्त, आर्थशास्त्रज्ञ, सर्जन होते, त्या काळात पोर्तुगालच्या संसदेत जाऊन भारतीय स्वातंत्र्याचा नारा देण्याचे धाडस त्यांनी दाखवले होते. तरुण , विद्यार्थ्यांनी डॉ. फ्रान्सिस लुईस गोम्स यांचा आदर्श घेऊन पुढे जावे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी केले.

डॉ. फ्रान्सिस लुईस गोम्स यांच्या १५६व्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून सरकारी पातळीवर मडगावात कोमुनिदाद इमारतीजवळील त्यांच्या पुतळ्याला तसेच नावेली येथील त्यांच्या स्मारकाला आदरांजली वाहण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. फ्रान्सिस लुईस गोम्स यांनी राष्ट्र प्रथम हे तत्व आचरणात आणले. आताच्या काळात नैतिक मूल्ये जपण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

डॉ. फ्रान्सिस लुईस गोम्स ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी सर्वांचे स्वागत केले. दोनच वर्षांनी त्यांची दुसरे शताब्दी वर्ष साजरे केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. फ्रान्सिस लाईस गोम्स यांची जयंती व पुण्यतिथी राज्य पातळीवर करण्याचा सरकारचा निर्णय स्त्युत्त असून त्याचे आपण स्वागत करतो असे फालेरो यांनी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात जिल्हा प्रशासनाने केलेली तयार प्रशंसनीय असल्याचेही त्यांनी सांगितले.

नावेलीच्या रोझरी चर्चचे धर्मगुरु फा. गाब्रिएल कुतिन्हो यांनी सांगितले, की डॉ. फ्रान्सिस लुईस गोम्स हे नावेलीचे. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा वारसा पुढे नेणे ही त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. नावेलीत आमदार उल्हास तुयेकर, माजी आमदार आवेर्तान फुर्तादो, जिल्हा पंचायत सदस्य एडविन कार्दोज, सरपंच पॉल पेरेरा, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एगना क्लिटस, पोलिस अधीक्षक तिकम सिंग वर्मा, स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई, अविनाश शिरोडकर, विनायक मोर्डेकर उपस्थित होते.

मडगाव येथील कोमुनिदाद इमारती जवळील कार्यक्रम १८ जून क्रांतीदिन समितीने जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित केला होता. या प्रसंगी साबांखा मंत्री दिगंबर कामत, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्ष बबिता नाईक, नगरसेवक महेश आमोणकर, दामोदर वरक, उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे, वाहतूक पोलिस उपअधिक्षत राजेंद्र प्रभुदेसाई, अविनाश शिरोडकर, विनायक मोर्डेकर हे मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Theft: वाढत्या घरफोड्या! कोलवा पोलिस तपासासाठी उत्तरप्रदेशात; लवकरच संशयित जाळ्यात सापडण्याची शक्‍यता

Goa Accident: कारचे तुकडे - तुकडे झाले, डिव्हायडर फोडून टँकरची रेंट अ कारला धडक; गोव्यात दोन पर्यटकांचा मृत्यू

Bicholim Car Drowning: रिव्हर्स घेताना गोंधळ झाला, कार गेली थेट नदीत; डिचोली सारमानस धक्क्यावरील थरारक घटना Video

Tiger In Goa: गोव्यात फिरतोय भला मोठा 'पट्टेरी वाघ'? पेडणे येथे दिसल्याचा दावा; लोकांमध्‍ये भीतीचे वातावरण

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात धक्कादायक उमेदवारी

SCROLL FOR NEXT