Minister Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Subhash Phaldesai: प्रत्‍येक ठिकाणी मंदिर उभारणे कठीण; एकच स्‍मारक बांधणार : सुभाष फळदेसाई

Subhash Phaldesai: पोर्तुगीजकाळात पाडण्यात आलेली मंदिरे पुन्हा उभारण्यासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करून खळबळ उडवून दिलेले राज्य सरकार अखेर या सर्व मंदिरांऐवजी एकच स्मारक मंदिर उभारणीचा विचार करण्यापर्यंत मवाळ झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Subhash Phaldesai: पोर्तुगीजकाळात पाडण्यात आलेली मंदिरे पुन्हा उभारण्यासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करून खळबळ उडवून दिलेले राज्य सरकार अखेर या सर्व मंदिरांऐवजी एकच स्मारक मंदिर उभारणीचा विचार करण्यापर्यंत मवाळ झाले आहे. पुरातत्‍व खात्‍याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी मंदिरे उभारण्यासाठीच्या माहितीची छाननी करण्याकरिता नेमलेल्या समितीनेच हा प्रस्ताव दिल्याचे सांगितले.

पाडण्‍यात आलेल्‍या मंदिरांची संख्या हजारावर आहे. तेथे प्रत्‍येक ठिकाणी आता पुन्हा मंदिर बांधण्याचा प्रयत्न केल्यास तो वादाचा मुद्दा ठरू शकतो. याची कल्पना आल्याने समितीनेच हा मध्यममार्ग सुचविला आहे. फळदेसाई म्हणाले, मंदिर फेरबांधणीसाठी अर्ज आले होते. त्या त्या ठिकाणी समितीच्या सदस्यांनी भेट दिली.

स्थानिकांशी चर्चा केली. काही ठिकाणी अवशेष आहेत. मंदिर कधी पाडले हे सिद्ध करणे शक्य आहे. मात्र त्या त्या ठिकाणी मंदिरे उभारण्यापेक्षा एकाच ठिकाणी भव्य असे स्मारक मंदिर उभारल्यास पर्यटकांसाठी ते आकर्षण ठरेल असा विचार पुढे आला आहे. इतिहास लोकांपर्यंत पोचवण्यासाठी याचा उपयोग होईल.

दरम्‍यान, दिवाडी बेटावर पाडण्‍यात आलेल्‍या सप्तकोटेश्वर मंदिराची फेरउभारणी करण्यात यावी, असे समितीने सुचविले आहे. समितीने आपले काम थांबवलेले नाही, तिने अंतरिम अहवाल सादर केला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत या विषयावर अद्याप बैठक झालेली नाही. त्यामुळे सरकार नेमके काय करणार हे सांगू शकत नाही, असेही फळदेसाई यांनी सांगितले.

पोर्तुगीजांनी पाडलेल्‍या प्रत्‍येक ठिकाणी मंदिर बांधणे शक्‍य होणार नाही. अनेक समस्‍या निर्माण होतील. शिवाय जमीन मालकीचा विषयही कटकटीचा असेल. बार्देश, तिसवाडी आणि सासष्टीत सर्वाधिक मंदिरे पाडण्‍यात आली आहेत. तसे अर्ज समितीकडे आलेले होते. याच तीन तालुक्यांपैकी एका तालुक्यात एकच स्मारक मंदिर उभारले जाईल.
- सुभाष फळदेसाई, पुरातत्‍व खात्‍याचे मंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fish Pollution: 'त्या अहवालामुळे नागरिकात भीतीचे वातावरण'! करंझाळेतील मच्छीमार आक्रमक; स्पष्टता देण्याची केली मागणी

Goa AAP: ‘आप’ची गोव्यात पडझड का? झेडपी निवडणुकीत झालेले पानिपत कुणामुळे?

बँकेचे ग्रील कापले, लॉकर तोडण्याचा प्रयत्न! वास्कोत गुन्हेगारीचा थरार, कॅनरा बँकेत चोरीचा प्रयत्न; तर मांगूर हिलवर जीवघेणा हल्ला

Aqua Mega Fish Festival: पणजीत रंगणार ‘ॲक्वा मेगा फिश फेस्टिव्हल’! देशभरातील विद्यार्थी, तज्ज्ञ येणार; ब्ल्यू इकॉनॉमीला चालना

Mopa Taxi Protest: मोपावरचे जाचक धोरण! टॅक्‍सीचालकांची मुख्‍यमंत्र्यांच्‍या निवासस्‍थानी धडक; CM सावंतांची शिष्टमंडळाशी चर्चा

SCROLL FOR NEXT