विद्यापीठ स्तरावर मराठी'वर परिसंवाद  Dainik Gomantak
गोवा

Goa News : कोणत्याही भाषेच्या विविध बोलींवर अजूनही काम होणे आवश्यक; एम्. के. जनार्दनम यांचे वक्तव्य

'विद्यापीठ स्तरावर मराठी'वर परिसंवाद

दैनिक गोमन्तक

भाषा हा माणसाचा सहजोद्‍गार आहे. मानवी संस्कृतीचे दर्शन भाषेमधून होते. व्यवहाराची भाषा म्हणून प्रमाण भाषेचा उपयोग झाला पाहिजे परंतु साहित्यातून बोलीभाषेचा सढळ वापर झाला पाहिजे व संशोधनातही बोली भाषेला महत्त्व आले पाहिजे तरच भाषिक संस्कृती खऱ्या अर्थाने जिवंत राहील असे प्रतिपादन ''गोवा राज्य संशोधन प्रतिष्ठान'' चे अध्यक्ष एम्.के. जनार्दनम यांनी केले.

ते गोवा विद्यापीठातील, शणैं गोंयबाब भाषा आणि साहित्य महाशाळा या अंतर्गत कार्यरत असलेल्या मराठी अध्ययनशाखा आणि अतिथी प्राध्यापक संशोधन‌ संचालनालय या अंतर्गत कार्यरत असलेल्या संत सोहिरोबानाथ आंबिये अध्यासनातर्फे आयोजित केलेल्या ''विद्यापीठ स्तरावर मराठी क्षेत्रात संशोधन: पुनरावलोकन आणि भावी दिशा'' या विषयावरील दोन दिवसाच्या राष्ट्रीय परिसंवादाचे उद्‌घाटन करताना बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. हरिलाल मेनन, शणैं गोंयबाब भाषा आणि साहित्य महाशाळेचे अधिष्ठाता के. श्रीपाद भट, या दोन दिवसीय चर्चासत्राचे बीजेभाषक प्रा. डॉ. मनोहर जाधव, मराठी अध्ययनशाखेचे संचालक प्रा. विनायक बापट आणि या चर्चासत्राचे संयोजक डॉ. विनय मडगावकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.

स्वागत मराठी अध्ययन शाखेचे संचालक प्रा. विनायक बापट यांनी केले. प्रास्ताविक डॉ. विनय मडगांवकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. चिन्मय घैसास यांनी केले तर पाहुण्यांची ओळख प्रा. जयेश गांवकर यांनी करून दिली. प्रा. हेमंत अय्या यांनी आभार मानले.

संशोधन आतंरशाखीय व्हावे

संशोधनासाठी वेगवेगळ्या विषयांचा विचार करणे आवश्यक असून आजच्या समाजाची आवश्यकता लक्षात घेऊन संशोधन झाले पाहिजे, तसेच आजचे संशोधन हे फक्त एकाच विषयापुरते मर्यादित न राहता आंतरशाखीय झाले पाहिजे,असे शणैं गोंयबाब भाषा आणि साहित्य महाशाळेचे अधिष्ठाता के. श्रीपाद भट यांनी सांगितले.

भाषेचा तंत्राधारे अभ्यास व्हावा

डॉ. जनार्दनम पुढे म्हणाले, की आता भाषेच्या संशोधनकार्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर योग्य प्रकारे करून घेणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानयुक्त सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आम्ही संशोधन कार्य अधिक अचूकपणे करू शकतो आणि नव्या पिढीने या संदर्भात गांभीर्याने विचार करायला पाहिजे.

अहवाल मराठीत यावेत ः मेनन

वैज्ञानिक संस्थांनी सादर केलेले पर्यावरण, हवामान बदल, सागरी जीवन अशाबद्दलचे अहवाल सरकार दरबारी पडून असतात त्याचे‌ मराठीत भाषांतर केल्यास हे ज्ञान सामान्य माणसापर्यंत पोहचेल व समाजात जागृकता निर्माण होईल. या संदर्भात गांभीर्याने विचार केला जावा,असे कुलगुुरू प्रो.हरिलाल मेनन यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

Rashi Parivartan Yog 2026: धनलाभ अन् प्रगतीचा योग! 'राशिपरिवर्तन योगा'ने 5 राशींच्या लोकांचे स्वप्न होणार पूर्ण; रातोरात चमकणार नशीब

Singer Death: मनोरंजन विश्वात खळबळ! रॉक संगीताचा दिग्गज काळाच्या पडद्याआड; फरहान अख्तर, विशाल ददलानी भावुक

Effigy Plastic Use: नरकासुर प्रतिमांसाठी प्लास्टिकचा वापर; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डोळ्यांवर पट्टी?

Smriti Mandhana Record: विराट-रोहितला जमलं नाही ते स्मृती मानधना करणार! टी-20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचण्याची संधी, फक्त इतक्या धावांची गरज

SCROLL FOR NEXT