Effigy Plastic Use: नरकासुर प्रतिमांसाठी प्लास्टिकचा वापर; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डोळ्यांवर पट्टी?

Plastic Use in Narakasura Effigies in Goa: नरकासुराच्या प्रतिमा तयार करण्यासाठी प्लास्टिक कागद आणि थर्माकोलचा सर्रास वापर केला जात असल्याने पर्यावरणाच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Plastic Use in Narakasura Effigies in Goa
Effigy Plastic UseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: नरकासुराच्या प्रतिमा तयार करण्यासाठी प्लास्टिक कागद आणि थर्माकोलचा सर्रास वापर केला जात असल्याने पर्यावरणाच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवाळीच्या पहाटे नरकासुराच्या प्रतिमांचे दहन केले जाते. त्यावेळी प्लास्टिक आणि थर्माकोल जळून हवेत प्रदूषणकारी घटक मिसळतात. दहनानंतर लोखंडी सांगाड्यावर थर्माकोलचे अवशेषही दिसून येतात. असे असताना राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे गांभीर्याने का पाहत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नरकासुराची प्रतिमा तयार करताना लोखंडी सळ्यांच्या सांगाड्यावर गवत किंवा कागदी पुठ्ठ्यांचा वापर अपेक्षित आहे. मात्र, अनेक ठिकाणी सांगाड्याभोवती प्लास्टिक गुंडाळून त्यावर कागद किंवा पुठ्ठे चिकटवले जातात. प्रतिमेचे हात, मुकुट, अलंकार आणि शस्त्रे तयार करण्यासाठीही थर्माकोलचा वापर केला जातो.

Plastic Use in Narakasura Effigies in Goa
Goa Cricket Association Audit: जीसीएचा कारभार वादात! 50 कोटींच्या व्यवहारांवर लेखापरीक्षणात गंभीर आक्षेप; चौकशीची मागणी

काही मंडळे गवत आणि कापड वापरत असली, तरी कमी वेळेत प्रतिमा तयार करण्यासाठी प्लास्टिकला प्राधान्य दिले जाते. पुठ्ठा किंवा कागदाच्या लगद्यापासून वस्तू तयार करणे वेळखाऊ असून, पावसात त्या टिकण्याची खात्री नसते, असे नरकासुराचे मुखवटे तयार करणाऱ्या कलाकारांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

सुदिन ढवळीकर मतावर ठाम!

नरकासुराच्या नावाखाली होणारा अवाजवी गोंधळ, धांगडधिंगा आणि वाढता राजकीय हस्तक्षेप यांमुळे सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांचे मोठे नुकसान होत आहे. ही विकृती रोखण्यासाठी नरकासुर दहनाची प्रथा आता पूर्णपणे बंद व्हायला हवी, असे मत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला गोव्यातील नरकासुर दहनाची प्रथा मूळ संस्कृतीपासून भरकटली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यापूर्वीही त्यांनी नरकासुर दहनाच्या प्रथेविषयी असेच मत मांडले होते.

Plastic Use in Narakasura Effigies in Goa
Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com