Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

Goa Chief Minister Merit Scholarship: उच्च शिक्षण खात्याने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
Goa Chief Minister Merit Scholarship
Student Financial AssistanceDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: देशातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये अखिल भारतीय कोट्याअंतर्गत पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवणाऱ्या गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, २०२५ अधिसूचित केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना ७५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य मिळणार आहे.

उच्च शिक्षण खात्याने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, आयआयटी, आयआयएम आणि एम्समध्ये प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये, तर आयएसआय, एनआयडी, टीआयएसएस, एनआयएफटी आणि अन्य अधिसूचित संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांना ७५ हजार रुपये मिळतील.

योजनेसंबंधित काही अटी

योजनेचा लाभ पदवीच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मिळेल. अर्जदार किमान १५ वर्षे गोव्याचा रहिवासी असावा. मूळ गोमंतकीयांसाठी सात वर्षांच्या वास्तव्याची अट असून, पालक किंवा आजी-आजोबांपैकी कोणाचा गोव्यात जन्म झाल्याचा पुरावा आवश्यक आहे. उच्च माध्यमिक परीक्षा गोव्यातून उत्तीर्ण असणे, नियमित पदवी अभ्यासक्रमात प्रवेश आणि बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. ऑनलाइन व दूरस्थ अभ्यासक्रमांना योजनेतून वगळले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com