Goa Congress state Executive Meeting Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: दीड वर्षानंतर गोवा काँग्रेसला जाग, घेतली बैठक झाला वाद; प्रभारी ठाकरे, पदाधिकाऱ्यांना धरले धारेवर

Goa Congress state Executive Meeting: काँग्रेस नेत्यांनी एकजुटीने काम करण्याचा संदेश देण्यासाठी बोलावलेल्या काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीतच नेत्यांमधील प्रखर मतभेद उघड झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: काँग्रेस नेत्यांनी एकजुटीने काम करण्याचा संदेश देण्यासाठी बोलावलेल्या काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीतच नेत्यांमधील प्रखर मतभेद उघड झाले. तब्बल दीड वर्षाने काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्याची आठवण का झाली, अशी जोरदार विचारणा यावेळी करण्यात आली. मागील बैठकीत घेतलेले निर्णय, त्यांची अंमलबजावणी आणि या बैठकीसाठी सुचविलेले भलतेच विषय यावरून अनेकांनी प्रभारी आणि पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले.

काँग्रेसचे राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे, सचिव प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर (Amit Patkar) उपस्थित होते.

निवडणूक बैठकीवर ठाकरेंचा भर

माणिकराव ठाकरे यांनी या बैठकीत निवडणूक (Election) तयारीवर भर दिला. जिल्हा पंचायत आणि विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. अंजली निंबाळकर यांनी सक्रिय कार्यकर्त्यांच्या मतदारसंघांची यादी तयार केली असून न पोहोचलेल्या मतदारसंघांना लवकरच त्या भेट देणार आहेत.

दीड वर्षाने बैठक

एल्विस गोम्स

दीड वर्षानंतर कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकालाच काही ना काही समस्या आहेत आणि त्या मांडताना चर्चा होणारच.

सुरेंद्र फुर्तादो

माझ्या विषयांवर चर्चा करण्याची मला संधी मिळाली नाही. कारण माझ्यापेक्षा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आपले मुद्दे मांडले. दीड वर्षांनंतर बैठक झाल्यामुळे नाराजी साहजिकच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT