Khorjuve Sikeri Bridge Dainik Gomantak
गोवा

Dicholim: खोर्जुवे पदपूल मोडकळीस; नवीन पुलाचा प्रस्ताव

Dicholim: दोन्‍ही आमदारांकडून पाहणी; नवीन पूल बांधण्यासाठी सरकार दरबारी प्रस्ताव पाठवणार

दैनिक गोमन्तक

Dicholim: डिचोलीतील सिकेरी आणि बार्देशमधील खोर्जुवे गावांना जोडणारा पदपूल धोकादायक बनल्याने या नदीवर नवीन पूल बांधण्याचा विचार पुढे आला आहे. त्यादृष्टीने हालचालीही सुरू झाल्या आहेत. सध्याच्या पदपुलाची पाहणी केल्यानंतर मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट आणि हळदोण्याचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनीही नवीन पूल बांधण्यासाठी सरकार दरबारी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सत्ताधारी पक्षाचे मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट आणि काँग्रेसचे हळदोण्याचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी मंगळवारी संयुक्तरित्या सिकेरी-खोर्जुवे पदपुलाची पाहणी केली. या पदपुलाची सध्याची स्थिती पाहून दोन्ही आमदारांनी चिंता व्यक्त केली.

तसेच नवीन पूल बांधण्यासाठी सध्याच्या पदपुलासह जवळील अन्य एका कमी अंतराच्या जागेची पाहणी केली. यावेळी आमदारांसमवेत मयेचे जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहाय्‍यक अभियंता गजानन देसाई, कनिष्ठ अभियंता मयूर गावकर तसेच दोन्ही गावचे पंचसदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

डिचोलीतील सिकेरी आणि खोर्जुवे या दोन गावांसाठी जिव्हाळ्याचा दुवा ठरलेल्या सध्याच्या लोखंडी पदपुलाची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. या पदपुलाच्या प्लेटी आणि रेलिंग गंजले असून, पदपूल मोडकळीस आला आहे.

पदपुलावरून दुचाकी सोडाच चालत जाणेही धोकादायक बनले आहे. तीन वर्षांपूर्वी या पदपुलावरून दुचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली होती. नंतर तात्पुरत्या प्लेटी घालण्यात आल्या होत्या. या पदपुलाची सध्याची दयनीय स्‍थिती पाहता नवीन पूल बांधावा अशी दोन्ही गावांतील लोकांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT