Bicholim Market Tukaram sawant
गोवा

Bicholim Market: डिचोली बाजारातील अतिक्रमणे हटविणार

Bicholim Market: आगीनंतर पालिकेला जाग :‘फायर हायड्रण्ट’ बसविण्याचा प्रस्ताव

दैनिक गोमन्तक

Bicholim Market: आगीसारख्या घटनेवेळी आपत्कालीन मदतकार्य म्हणून येथील बाजारात नव्याने ''फायर हायड्रण्ट''ची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी दिली आहे.

गुरुवारी रात्री बाजारात भीषण आगीची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेला आता खडबडून जाग आली आहे. काही वर्षांपूर्वी शहरात ''फायर हायड्रण्ट''ची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र आता ती कुचकामी ठरली आहे.

आमदारांकडून सूचना : ‘फायर हायड्रण्ट'संबंधी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी पालिकेला सूचना केली आहे. लवकरच पालिका मंडळाची बैठक घेऊन तसा ठराव घेण्यात येईल.

बाजारातील अतिक्रमणे हटविली नाहीत तर कारवाई अटळ आहे. पालिका कोणाही दुकानदारांच्या विरोधात नाही, बाजारपेठ सुरक्षित राहावी, हा उद्देश आहे, असे नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी सांगितले.

बाजारात अडथळा

गुरुवारी रात्री बाजारात आगीची घटना घडली, त्यावेळी अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी नेण्यास अडथळा निर्माण झाला. अतिक्रमण आणि ऊन-पावसापासून बचाव व्हावा म्हणून बहुतेक दुकानदारांनी प्लॅस्टिकची आच्छादने घातली आहेत. या अडथळ्यामुळे बंब बाजारात नेणे शक्य झाले नाही. परिणामी मुख्य रस्त्यावर बंब उभे करून मदतकार्य करावे लागले. याची पालिकेने गंभीर दखल घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT