Dhiryo In Goa Dainik Gomantak
गोवा

Dhiryo In Goa: कोलवा परिसरात धीरयोंचे आयोजन!

गोव्यात धीरयोवर बंदी असली तरी कोलवा पोलिस स्थानकाच्या हद्दीत त्या खुलेआम होत आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Dhiryo In Goa: राज्यात धीरयोवर बंदी असली तरी कोलवा पोलिस स्थानकाच्या हद्दीत त्या खुलेआम होत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. एका राजकारण्याच्या पुतण्याचाच या आयोजनात हात असल्याने पोलिसही त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

दोन दिवसांपूर्वी माजोर्डा येथे अशाच प्रकारे बेकायदेशीर धीरयो लावण्यात आल्या होत्या. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला. मात्र, या संबंधी कोलवा पोलिसांशी संपर्क साधला असता अशा प्रकारच्या धीरयोंचे आयोजन केल्याची आम्हाला कुठलीच माहिती नाही असे म्हणत त्यांनी कानावर हात ठेवले. पोलिस निरिक्षक थेरन डिकोस्टा म्हणाले,‘आम्ही सगळीकडे चौकशी केली पण काहीच माहिती मिळाली नाही.'

दरम्यान, माजोर्डा येथे धिरीयो झाल्याच नाहीत म्हणणाऱ्या कोलवा पोलीसांनी रात्री उशिरा या प्रकरणी जावेद कित्तुर आणि तनय लोहार या दोघांना अटक करून नंतर त्यांची जामिनावर सुटका केली. या झुंझीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

आणि त्यामुळे तो चर्चेचा विषय बनला होता. धीरयो म्हणजे रेड्यांच्या किंवा बैलांच्या झुंजी असून सासष्टी तालुक्यात त्या अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यात प्राण्यांचे हाल होत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी आणली असली तरी सासष्टीतील किनारपट्टी भागात त्या सर्रास चालू आहेत. या धीरयोंच्यावेळी लाखो रुपयांचा सट्टा लावला जात असतो.

या धीरयोंचे आयोजन कुठे होत असते याची इत्यंभूत माहिती पोलिसाना असते तरीही ते त्यांच्यावर का करवाई करत नाहीत याबद्दल लोक आश्र्चर्य व्यक्त करत आहेत.

एका धीरयो मागे पोलिसांना 25 हजारांचा हप्ता जात असून ‘त्या’ राजकीय नेत्याचा पुतण्याच ही मांडवली करत असल्याची माहिती आहे. यापूर्वी कोलवा येथे झालेल्या एका झुंजीची माहिती पोलिसांनी अशीच जाणूनबुजून लपवून ठेवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुंबईतही सुरु होणार गोव्यासारखी पायलट सेवा! रिक्षा-टॅक्सीला पर्याय, दर खिशाला परवडणारा; माहिती घ्या

Mandrem: 'पर्यटन खाते लाखोंचे टेंडर देते, पैसा जातो कुठे'? कचऱ्यात बुडाले मांद्रेचे किनारे; स्थानिकांत संतापाची लाट

Goa Taxi: कर्नाटकातील ‘गोझो कॅब्स’ टॅक्सी गोव्यात? टॅक्‍सीमालकचा आरोप; कठोर कारवाईची मागणी

Horoscope: प्रेम व्यक्त करण्यासाठी 'योग्य' दिवस! वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी 'या' वेळी प्रपोज केल्यास होणार फायदा

Missing Womens: 2 ज्येष्ठ महिला अचानक बेपत्ता! मये भागात खळबळ; संशयास्पद ठिकाणी शोधमोहीम सुरु

SCROLL FOR NEXT