Football  Dainik Gomantak
गोवा

I-League Football Tournament: धेंपो स्पोर्टस क्लबचा शानदार विजय; केंकरे एफसीचा उडवला धुव्वा

Dhempo Sports Club beat Kenkare FC: धेंपो स्पोर्टस क्लबने केंकरे एफसीवर 4-0 एकतर्फी फरकाने मात करून आय-लीग 2 फुटबॉल स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.

किशोर पेटकर

I-League Football Tournament: कपिल होबळे याने नोंदवलेल्या दोन गोलच्या बळावर धेंपो स्पोर्टस क्लबने केंकरे एफसीवर 4-0 एकतर्फी फरकाने मात करून आय-लीग 2 फुटबॉल स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. सामना सोमवारी मुंबईजवळील खारगर येथे झाला.

दरम्यान, कपिलने अनुक्रमे 12व्या व 81व्या मिनिटास गोल केला. याशिवाय नेसियो फर्नांडिसने 33व्या, तर डेस्मन परेराने 90+5व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल करून धेंपो क्लबच्या मोठ्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली. सामन्याच्या 80व्या मिनिटास केंकरे एफसीचा एक खेळाडू कमी झाला. त्यांच्या पवन व्यंकटरत्नम याला रेफरीने अखिलाडूवृत्तीबद्दल रेड कार्ड दाखविले.

दुसरीकडे, समीर नाईक यांच्या मार्गदर्शनाखालील धेंपो क्लबचा हा 12 लढतीतील सहावा विजय ठरला. त्यामुळे त्यांचे 21 गुण झाले व दुसरा क्रमांक मिळाला. त्यांनी आता प्रत्येकी 20 गुण असलेल्या एफसी बंगळुरु युनायटेड व सुदेवा दिल्ली एफसीवर एका गुणाची आघाडी घेतली आहे. केंकरे एफसीला नववा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे 12 लढतीनंतर त्यांचे नऊ गुण आणि शेवटचा आठवा क्रमांक कायम राहिला. धेंपो क्लबचा पुढील सामना 21 एप्रिल रोजी वास्को येथील टिळक मैदानावर पारंपरिक प्रतिस्पर्धी स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाविरुद्ध होईल.

स्पोर्टिंग बंगळुरुचे अग्रस्थान भक्कम

नवी दिल्ली येथील आंबेडकर स्टेडियमवर सोमवारी आणखी एका सामन्यात स्पोर्टिंग क्लब बंगळूरने सुदेवा दिल्ली एफसीला 1-0 फरकाने निसटते हरविले. यामुळे बंगळूरुच्या संघाचे अग्रस्थान भक्कम झाले. त्यांचा हा 12 लढतीतील नववा विजय ठरला. त्यांचे आता सर्वाधिक 27 गुण झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील धेंपो क्लबच्या तुलनेत त्यांचे सहा गुण जास्त आहेत. सुदेवा दिल्ली संघाला पराभवामुळे धक्का बसला. त्यांचा हा 12 लढतीतील चौथा पराभव ठरला. त्यामुळे ते 20 गुणांसह ते चौथ्या स्थानी घसरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan 2025: श्रावण महिना सुरु होतोय, सर्व मनोकामना पूर्ण होतील! जाणून घ्या तिथी आणि शुभ योग कोणते?

Foreign Nationals Arrested: डिचोलीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 2 परदेशी महिलांना अटक

Crime News: "तुझ्या पतीच्या स्पर्ममध्ये विष, माझ्यासोबत संबंध ठेव" पाद्रीचा उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

Undertaker Viral Video: भारताचा अंडरटेकर! चिमुकल्या चाहत्याची एंट्री पाहून WWE प्रेमी थक्क, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, भारीच...

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

SCROLL FOR NEXT