I-League Football Tournament: धेंपो क्लबला युनायटेडने रोखले; दीपेश मुर्मूच्या गोलने साधली बरोबरी

I-League Football Tournament: धेंपो स्पोर्टस क्लबला बुधवारी आय-लीग 2 फुटबॉल स्पर्धेत दोन महत्त्वपूर्ण गुणांना मुकावे लागले.
I-League Football Tournament
I-League Football TournamentDainik Gomantak
Published on
Updated on

I-League Football Tournament: धेंपो स्पोर्टस क्लबला बुधवारी आय-लीग 2 फुटबॉल स्पर्धेत दोन महत्त्वपूर्ण गुणांना मुकावे लागले. पिछाडीवरुन युनायटेड स्पोर्टस क्लबने त्यांना 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. हा सामना एला-जुने गोवे येथील मैदानावर झाला.

दरम्यान, नेसियो फर्नांडिस याने सामन्याच्या दुसऱ्या मिनिटास केलेल्या गोलमुळे धेंपो क्लबला आघाडी मिळाली होती. विश्रांतीला ते या गोलमुळे वर्चस्व राखून होते. 53व्या मिनिटास दीपेश मुर्मू याच्या गोलमुळे युनायटेड क्लबने बरोबरी साधली. दोन्ही संघांना लढतीतून प्रत्येकी एक गुण मिळाला. त्यामुळे 11 सामन्यानंतर धेंपो क्लबचे 18 गुण झाले व ते तिसऱ्या स्थानी कायम राहिले. पाच विजय, तीन बरोबरी व तीन पराभव अशी माजी आय-लीग विजेत्यांची स्पर्धेतील कामगिरी आहे. युनायटेड क्लबला सलग चार पराभवानंतर गुण मिळाला. त्यांचे 11 लढतीनंतर आठ गुण झाले आणि सातवा क्रमांक कायम राहिला.

I-League Football Tournament
I-League Football Tournament: स्पोर्टिंग गोवा शर्यतीत कायम! बंगळूरु युनायटेडवर नोंदवला निसटता विजय

दुसरीकडे, स्पर्धेतील अन्य एका लढतीत ऑरेंज एफसीविरुद्ध एफसी बंगळूर युनायटेडने 2-2 अशी गोलबरोबरी साधली. बंगळूर युनायटेडचे 11 लढतीनंत 20 गुण झाले असून ते दुसऱ्या स्थानी कायम राहिले. ऑरेंज एफसीने एक गुण मिळवत 11 लढतीनंतर गुणसंख्या आठवर नेली. ते शेवटच्या आठव्या स्थानी आहेत.

I-League Football Tournament
I-League Football Tournament: चर्चिल ब्रदर्सचा ऐजॉल एफसीवर दोन गोलने दणदणीत 'विजय'

स्पोर्टिंग गोवासमोर खडतर आव्हान

वास्को येथील टिळक मैदानावर गुरुवारी (ता. 11) स्पोर्टिंग क्लब द गोवा व स्पोर्टिंग क्लब बंगळूर यांच्यात लढत होईल. बंगळूरचा संघ सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. या संघाने सलग सात सामने जिंकले आहेत. 10 लढतीत आठ विजय व दोन पराभव या कामगिरीसह 24 गुणांसह ते सध्या अव्वल स्थानी आहेत. त्यांच्याविरुद्ध स्पोर्टिंग क्लब गोवासाठी खडतर आव्हान असेल. स्पोर्टिंग गोवा संघ 16 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी मागील दोन्ही सामने जिंकलेले असले, तरी बंगळूरच्या संघाचे गुरुवारी पारडे जड असेल. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात स्पोर्टिंग क्लब बंगळूरने 1-0 फरकाने विजय मिळविला होता. स्पोर्टिंग क्लब गोवाने विजय नोंदविल्यास त्यांना तिसऱ्या क्रमांकाची संधी मिळेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com