I-League Football Tournament: चर्चिल ब्रदर्सचा ‘सप्ततारांकित’ विजय; राजस्थान युनायटेडचा उडवला धुव्वा

I-League Football Tournament: आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील मोहिमेचा समारोप चर्चिल ब्रदर्सने ‘सप्ततारांकित’ विजयाने केला.
Churchill Brothers beat Rajasthan United by 7-0 in the I-League Football Tournament
Churchill Brothers beat Rajasthan United by 7-0 in the I-League Football TournamentDainik Gomantak

I-League Football Tournament: आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील मोहिमेचा समारोप चर्चिल ब्रदर्सने ‘सप्ततारांकित’ विजयाने केला. बुधवारी रात्री वास्को येथील टिळक मैदानावर त्यांनी राजस्थान युनायटेडचा 7-0 गोलफरकाने धुव्वा उडवला.

दरम्यान, चर्चिल ब्रदर्सने पूर्वार्धात दोन गोलची आघाडी घेतली होती, नंतर उत्तरार्धात आणखी पाच गोल डागले आणि यंदाच्या आय-लीग स्पर्धेतील आपला सर्वांत मोठा विजय साकारला. त्यांचा हा 24 लढतीतील एकंदरीत नववा, तर सलग तिसरा विजय ठरला. 33 गुणांसह माजी आय-लीग विजेत्यांना सहावा क्रमांक मिळाला. राजस्थान युनायटेडचा हा 24 लढतीतील अकरावा पराभव ठरला. त्यामुळे 25 गुणांसह ते नवव्या क्रमांकावर कायम राहिले. यंदा स्पर्धेत त्यांच्यावर तिसऱ्यांदा सामन्यात सहाहून जास्त गोल स्वीकारण्याची नामुष्की आली.

Churchill Brothers beat Rajasthan United by 7-0 in the I-League Football Tournament
I-League Football Tournament: धेंपो क्लबला युनायटेडने रोखले; दीपेश मुर्मूच्या गोलने साधली बरोबरी

दुसरीकडे, सामन्याच्या 17व्या मिनिटास लुईस ओगाना याने पहिला गोल केला, नंतर 26व्या मिनिटास रिचर्ड कॉस्ता याने आघाडी 2-0 अशी वाढविली. 46व्या मिनिटास ओगाना याने आणखी एक गोल केला. नायजेरियन खेळाडूचा हा स्पर्धेतील वैयक्तिक सातवा गोल ठरला. नंतर 50व्या मिनिटास लामगौलेन सेमखोलुन याने संघाची आघाडी 4-0 अशी मजबूत केली. मार्टिन चावेस याने 73व्या मिनिटास चर्चिल ब्रदर्सच्या खाती पाचव्या गोलची भर टाकल्यानंतर बाकी दोन गोल बदली खेळाडूंनी केले. ट्रिजॉय डायस याने 88व्या मिनिटास, तर अब्दौ करीम सांब याने 90+4व्या मिनिटास गोल करून चर्चिल ब्रदर्सच्या दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com