Dhavalim-Ponda Road Closed due to scrapyard fire Dainik Gomantak
गोवा

Dhavalim-Ponda Road Closed: ढवळीत लागलेल्या आगीनंतर मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद; 'या' पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू

या रस्त्यावरील वाहतूक बेतोडा जंक्शनकडून वळवण्यात आली आहे

Kavya Powar

Dhavalim-Ponda Road Closed: काल (5 मे) फोंडा ढवळी इथल्या भंगारअड्ड्याला भीषण आग लागली होती. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही आग इतकी भीषण होती की, आग विझवण्यासाठी एकूण 28 टँकर्स वापरण्यात आले होते. काल जरी आग विझली असली तरीदेखील अजूनही ती आग धुमसत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ढवळी-फोंडा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

काल आगीवर नियंत्रण मिळाले असले तरी भंगारअड्ड्यात आतमध्ये अजूनही आग धुमसतच आहे. त्यामुळे बॅरिकेड्स टाकून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत ही आग संपूर्णपणे विझत नाही तोपर्यंत हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.

फोंड्यात जाण्यासाठी हा मुख्य मार्ग असल्याने वाहनचालकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. माहितीनुसार, या रस्त्यावरील वाहतूक बेतोडा जंक्शनकडून वळवण्यात आली आहे. त्यामुळे दुचाकीचालकांना साधारण 3 किलोमीटर तर चारचाकी आणि मोठ्या वाहनचालकांना 6 किलोमीटर ज्यादाचे अंतर पार करावे लागत आहे.

Dhavalim-Ponda Road Closed

जर आज संध्याकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली तर मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता असल्याचा अंदाज घटनास्थळी असलेल्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केला. मात्र अद्याप याबाबत कोणतीही ठोस माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:

दरम्यान, तिथे असलेले भंगारअड्डे हे अवैध असून परिसरातील नागरिकांच्या जीवाला यामुळे हानी पोहोचत असल्याचे मत राहिवाश्यांनी व्यक्त केले. काल आग लागल्यानंतर वीजमंत्री ढवळीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी येत्या 15 दिवसांत हे अड्डे हटवण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT