सुदिन ढवळीकर, दिपक ढवळीकर आणि अरविंद केजरीवाल Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ढवळीकर बंधूंच्या केजरीवाल भेटीचा अर्थ काय ?

ही केवळ सदिच्छा भेट होती आणि युतीसंदर्भातील जे काही बोलणी असतील, ती ऑगस्टनंतरच होऊ शकतील, असे सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी या बैठकीनंतर सांगितले.

दैनिक गोमन्तक

पणजी: महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (MGP) अध्यक्ष दीपक ढवळीकर आणि आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी आज (मंगळवारी) सायंकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची पणजीतील एका हॉटेलमध्ये घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, ही केवळ सदिच्छा भेट होती आणि युतीसंदर्भातील जे काही बोलणी असतील, ती ऑगस्टनंतरच होऊ शकतील, असे सुदिन ढवळीकर यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केले. (Dhavalikar brothers met Arvind Kejriwal in Goa)

ढवळीकर म्हणाले, मागे एकदा केजरीवाल यांची आपल्याशी भेट झाली होती. त्यानंतर मात्र प्रत्यक्षात कधी भेटण्याची संधी मिळाली नव्हती. दिल्ली आणि गोव्याचे एकच केडर असल्याने भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांकडून माझ्याविषयी केजरीवाल यांना बरीच माहिती मिळाली असल्याचे जाणवले. त्यांचे आताचे सचिव हे पूर्वी माझे सचिव होते.

केजरीवाल यांनी दिल्लीत ऑनलाईन शिक्षणाविषयी अनेक प्रयोग केले आहेत. त्याविषयी मी त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. आरोग्य सेवेबाबत त्यांनी तेथे केलेली कामगिरी, प्रशासकीय सुधारणा याबाबतही मी माहिती जाणून घेतली. हे निवडणूक वर्ष असल्यामुळे दोन राजकारण यांची भेट होणे याचा राजकीय अर्थ काढला जाणे शक्य आहे. मात्र, आजची भेट ही युतीसंदर्भात कोणतीही बोलणी करण्यासाठी नव्हती.

दरम्यान, केजरीवाल यांनीच परवा मला दूरध्वनी करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार ही सदिच्छा भेट घेतली, आयाराम गयाराम यांना गोव्याच्या राजकारणात स्थान असता कामा नये, अशी पक्षाची ठाम भूमिका आहे. अशा आयाराम गयारामांना वगळून जर कोणी युतीसंदर्भात बोलणार असेल तर आम्ही बोलणी करण्यास तयार आहोत. बोलणी केली म्हणजे युती झाली, असे नव्हे. त्या पक्षाकडे भविष्यातही फुटू न शकणारे आमदार असतील याची खात्री आता करावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT