suke kulan accident  Dainik Gomantak
गोवा

Dhargal-Mopa Road Accident: सुके कुळण येथे ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले; एक ठार, एक जखमी; संतप्त जमावाने पेटवल्या दोन क्रेन

धारगळ-मोपा मार्गावर अपघात; रस्ते बांधकामासाठी केला जात होता ट्रकचा वापर

Akshay Nirmale

Dhargal-Mopa Road Accident: रस्ते बांधकामासाठीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुचाकीच्या मागे बसलेला आणखी एक जण जखमी झाला आहे. धारगळ-मोपा मार्गावर सुके कुळण येथे हा अपघात झाला.

नामदेव नारायण कांबळी (63 वर्षे) असे मृताचे नाव आहे. तर काशिनाथ तुकाराम शेट्ये (64 वर्षे) हे जखमी झाले आहेत. हे दोघेही मूळचे म्हापसा येथील आहेत.

सध्या या ठिकाणी फ्लायओव्हर (उड्डाणपुल) चे बांधकाम सुरू आहे. त्या कामात या ट्रकचा वापर केला जात होता. दरम्यान, या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने येथे फ्लायओव्हरच्या बांधकामात वापरली जात असलेल्या दोन क्रेन पेटवून दिल्या आहेत.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तथापि, जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.

अद्यापही ट्रक आणि ट्रकच्या खाली आलेला मृतदेह तसाच असल्याचे सांगण्यात येत आहे. जमाव आक्रमक होत असल्याचे पाहून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahavatar Narasimha: ‘महावतार नरसिंह’ची गर्जना! एका दिवसात कमावले 'इतके' कोटी; विक्रमी कलेक्शनकडे वाटचाल

Viral Video: हे काय चाललंय! महिलेचा 'हा' व्हिडिओ पाहून तुम्हीही माराल डोक्यावर हात; नेटकरी व्यक्त करतायेत संताप

Accident in Goa: कुंडई औद्योगिक वसाहतीत अपघात; छत दुरुस्ती करताना कामगाराचा मृत्यू!

Goa Crime: प्रेमाचा त्रिकोण! सांगोल्डात युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; प्रियकरासोबत-प्रेयसी फरार

Goa Live Updates: चेन्नई-तामिळनाडू येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विभागीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोवा महिला संघ उपविजेता

SCROLL FOR NEXT