Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

धनगर समाज आजपर्यंत मूलभूत सुविधेपासून वंचितच: चोडणकर

दैनिक गोमन्तक

मोरजी: मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे (Dayanand Sopte) जर कॉंग्रेसचा (Congress) त्याग करून भाजपा (Bjp) सरकारात गेले तर मग त्यांनी आपल्याच मतदार संघातील तुये येथील चार धनगर समाजातील घराना वीज पाणी रस्त्ये का पोचवले नाही असा संतप्त सवाल गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उपस्थित केला . तुये येथील चार धनगर समाजाच्या घरात 90 वर्षानंतर विजेचे बल्ब मांद्रेचे युवा कॉंग्रेस नेते सचिन परब (Sachin Parab) यांच्या मार्फत सोलार तर्फे विजेचे दिवे पेटवण्यात आले , 90 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर या घरात दिवे पेटल्यावर घरच्या मंडळीच्या चेहऱ्यावर जे हास्य होते ते पाहण्या योगे होता.

या कार्यक्रमाला युवा कॉंग्रेस नेते सचिन परब , माजी मंत्री संगीता परब , कॉंग्रेस महिला अध्यक्ष बिना नाईक , वरद म्हार्दोलकर , नारायण रेडकर , उत्तर गोवा कॉंग्रेस अध्यक्ष विजय भिके , रेखा महाले , आनंद शिरगावकर , लक्ष्मिकान्त शेटगावकर अनिता वाडजी , सरपंच सुहास नाईक , पंच आनंद साळगावकर ,माजी सरपंच किशोर नाईक आदी उपस्थित होते.

गिरीश चोडणकर यांनी बोलताना कॉंग्रेस पक्ष हा गरीबापर्यंत पोचणारा पक्ष आहे . सरकारने ठरवले असते तर या घरापर्यंत कधीच वीज दिली असती . त्यांच्याकडे ती एजन्सी आहे ,मात्र सरकारला त्यांचे पडलेले नाही , सचिन परब यांनी या गरीब कुटुंबियाना विजेची सोय करून सरकार , मुख्यमंत्री , स्थानिक आमदार दयानंद सोपटे आणि धनगर समाजाचे प्रतीतीनिध्व करणारे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांची लक्तरे वेशीवर आणली आहेत . असा दावा केला.

आमदाराने स्वताला विकले

कॉंग्रेसचे जे आमदार दयानंद सोपटे ज्यांनी मुख्यमंत्री पार्सेकर यांचा पराभव करून जाईट किलर ठरले होते त्यांनी स्वताला दिल्ही येथे करोडो रुपयाना विकले , त्यामुळे त्याना गरीबांचा कळवला नाही . जो स्वताला विकतो तो गरीबांचा विकास कसा करणार असा सवाल गिरीश चोडणकर यांनी उपस्थित केला.

संगीता परब

माजी मंत्री संगीता परब यांनी बोलताना कॉंग्रेस पक्षाने आता पर्यंत गरिबांच्या विकासाठी प्रयत्न केले . कॉंग्रेस पक्षाचे बळ दिवसेंदिवस वाढत आहे . पूर्वी कॉंग्रेस आमदारावर जे भ्रष्टाचाराचे आरोप होत होते तेच आमदार आज भाजपात आहे , त्यामुळे ते आता भाजपची बी टीम आहे कॉंग्रेस स्वच्छ झालेली आहे , आता भविष्यात कॉंग्रेसची धुरा युवा कार्यकर्त्यांकडे जात आहे त्यामुळे कॉंग्रेसने आगामी निवडणुकीत मांद्रे मधून युवकाना संधी देण्याची मागणी केली.

बिना नाईक

महिला कॉंग्रेस अध्यक्ष बिना नाईक यांनी बोलताना भाजपा हे श्रीमंतांचे सरकार आहेत ,त्यामुळे त्यांचे गरिबांकडे लक्ष नाही , आज दिवे पटवून खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होत आहे , दोन किलोमीटरवर अंतरावर इलेक्ट्रोनिक सिटी येत आहे तर चार किलोमीटर अंतरावर आमदार सोपटे यांचे घर आहे , मग हे अंधारात असलेले कुटुंब आमदार दयानंद सोपटे याना कसे काय दिसले नाही असा सवाल उपस्थित केला.

सचिन परब

कॉंग्रेस युवा नेते सचिन परब यांनी बोलताना आपण कधी मतांची गणिते केली नाही , किंवा राजकीय लाभ उठवण्यासाठी दिवे पेटवले नाही , गरिबांच्या घरात दिवे पेटतात या पेक्षा दुसरा आनंद आम्हाला नाही असे सांगून या कुटुंबियाना सर्व त्या सोयी पुरवण्यासाठी आमचे प्रयंत्न असतील असे सांगितले.

धनगर कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करताना घरात वीज पेटल्यावर खूप आनंद होतो वीज नसल्याने मुलांची शिक्षणे अडली , इन्टरनेट सेवा नसल्याने शिक्षणही अडले अशी व्यथा कुटुंबीयांनी मांडली. यावेळी वरद म्हार्दोलकर , विजय भिके , व नारायण रेडकर यांनी भाषणे केली .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT