(Goan Folk Dance) पणजी : गोव्याच्या पारंपरिक लोकनृत्याचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन करण्याच्या हेतूने कला आणि संस्कृती संचालनालयाच्यावतीने 2002 सालापासून धालो, फुगडी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. हे दोन्ही लोकनृत्यप्रकार महिला गटांद्वारे सादर केले जातात. यंदा 4 डिसेंबर रोजी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
संचालनालयाने दोन वर्षांतून एकदा या महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतल्याने 2022-23 साठीचा हा महोत्सव असणार आहे. प्रत्येक गटाला लोकनृत्य सादरीकरणासाठी 10 मिनिटांचा अवधी दिला जाईल. हा महोत्सव राज्यातील 11 वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. यात धालो, फुगडी सादर करणाऱ्या लोककलाकार व मंडळांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सहभागी गटांनी पारंपरिक पोशाखात धालो किंवा फुगडी लोकनृत्य सादर करावे. संचालनालयाकडून सहभाग शुल्क देण्यात येईल. प्रत्येक गटात जास्तीत जास्त 15 आणि किमान 12 सहभागी असावेत. इच्छुक गटांनी 25 नोव्हेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत संस्कृती भवन येथील कार्यालयातून विहित नमुन्यातील अर्ज भरून संचालनालयाच्या कार्यालयात सादर करावेत. सर्व गटांना निशुल्क प्रवेश दिला जाईल. प्रथम अर्ज करणाऱ्या प्रथम प्राधान्य दिले जाईल.
महोत्सवाची स्थळे
महालसा नारायणी देवस्थान, वेर्णा, सातेरी देवी जल्मी देवस्थान, दावकोन-धारबांदोडा, शांतादुर्गा देवस्थान खांडोळा, स्वामी समर्थ मठ शिवोली-बार्देश, देव कुळमाया देवस्थान कारापूर-डिचोली, देवी भगवती देवस्थान पार्से, ब्रह्मदेव देवस्थान ब्रह्मकरमळी, पिंपळेश्वर दत्त मंदिर ट्रस्ट पिंपळेश्वर चिंचोळी-पणजी, शांतादुर्गा देवस्थान पारोडा आणि श्री मल्लिकार्जुन मंदिर श्रीस्थळ-काणकोण या ठिकाणी महोत्सव होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.