DG of Police Mukesh Kumar Meena expressed view that Goa needs to be drug free  Dainik Gomantak
गोवा

'गोवा अंमली पदार्थमुक्त होण्याची गरज'

अंमलीपदार्थ व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच या व्यवहारात असलेल्यांचा शोध घेण्यासाठी खात्याने चार श्‍वान पोलिसांच्या मदतीसाठी घेण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा राज्याकडे (Goa Government) अंमली पदार्थाचे केंद्र म्हणून बघितले जाऊ नये यासाठी राज्याची प्रतिमा बदलून ते अंमली पदार्थमुक्त राज्य करण्याची गरज आहे, असे मत मावळते पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा (DG of Police Mukesh Kumar Meena) यांनी व्यक्त केले.

किनारपट्टी परिसरात तसेच इतर अंतर्गत भागामध्ये अंमली पदार्थावर नियंत्रण ठेवण्यासाठी अंमलीपदार्थविरोधी कक्ष तसेच जिल्हा पोलिसांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्याच्या सीमा, विमानतळ तसेच रेल्वे स्थानके या मार्गाने अंमली पदार्थ गोव्यात येणार नाही याकरीता ठोस पावले उचलण्याचे निर्देश पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. अंमलीपदार्थ व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच या व्यवहारात असलेल्यांचा शोध घेण्यासाठी खात्याने चार श्‍वान पोलिसांच्या मदतीसाठी घेण्यात आले आहेत.

राज्याचे पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांची दिल्लीमध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी 1995 ॲग्मूट केडरचे आयपीएस अधिकारी इंद्रदेव शुक्ला (IPS Indradev Shukla) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा बदलीचा आदेश काल गृह मंत्रालयाने काढला. नवे पोलिस महासंचालक इंद्रदेव शुक्ला हे गोव्यात अनेक वर्षे होते. 1995 मध्ये त्यांची राज्यात पोलिस उपअधीक्षकपदी नेमणूक झाली होती. तेव्हा ते पणजीचे उपविभागीय पोलिस अधिकारी होते. त्यानंतर त्यांना अधीक्षकपदी बढती मिळाली व त्यानंतर ते आयपीएस ॲग्मूट केडरमध्ये अधिकारी बनले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pirna Nadoda: वाढदिवसादिवशी बाहेर पडला, नंतर सापडला कुजलेला मृतदेह; 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Petrol Diesel Prices In Goa: लॉंग विकेंडला गोव्यात जाताय? पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जाणून घ्या..

Goa Live Updates: आज अटल बिहारी वाजपेयी यांचा स्मृतिदिन

Krishna Janmashtami 2025: कराचीमध्ये भजन, बांगलादेशमध्ये मिरवणूक; 'श्रीकृष्ण जन्माष्टमी' जगभर कशी साजरी होते?

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

SCROLL FOR NEXT