Goa Culture Dainik Gomantak
गोवा

Goa Culture : आगोंदमधील श्री लाखणेश्वर देवस्थानच्या जत्रौत्सवाला भाविकांची गर्दी

आगोंद पंचायत क्षेत्रातील मुडकूड येथील सुप्रसिद्ध श्री लाखणेश्वर देवस्थानात आज 7 मार्चपासून सकाळी 7 वा. दिवजोत्सव तसेच तद्नंतर ढोल-जगाटच्या घोषात जत्रौत्सवाला सुरुवात झाली.

दैनिक गोमन्तक

Goa Culture : आगोंद पंचायत क्षेत्रातील मुडकूड येथील सुप्रसिद्ध श्री लाखणेश्वर देवस्थानात आज 7 मार्चपासून सकाळी 7 वा. दिवजोत्सव तसेच तद्नंतर ढोल-जगाटच्या घोषात जत्रौत्सवाला सुरुवात झाली. या उत्सवानिमित्त गावाबाहेर राहणारे काही महाजन व अन्य भाविक यांनी गावाकडे प्रयाण करायला सुरुवात केली आहे.

श्री लाखणेश्वर देवस्थानात श्रीस्थळ, काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानाच्या अवतारपुरुषाच्या लवाजम्यासह तरंगाचे आगमन सोमवार दि. 6 रोजी आगोंद येथील सुप्रसिद्ध धर्मे कुटुंबियांच्या तळया व अल्पोपहार घेतल्या नंतर रात्री 11 च्या दरम्यान झाले. श्री लाखणेश्वर देवस्थानातील पुरोहितांच्या हस्ते अवतारपुरुषाच्या तरंगाची पुजा आणि मध्यरात्री 12 च्या दरम्यान झाली.

आज सकाळी दिवजोत्सव, भोंवर आणि परिवार देवताना मान-पान आदी कार्यक्रम पार पडला. त्यानंतर अवतार पुरुषाच्या तरंगाचे येथील गरवई तुळशी वृंदावनाजवळ तळया स्विकारल्या गेल्या. सर्वत्र चैतन्यमय व उल्ल्हासाटच्या वातावरणात जत्रौत्सव होत आहे.

हा जत्रौत्सव यशस्वी यशस्वीरित्या होण्याकरता देवस्थान समिती अध्यक्ष काशिनाथ फळदेसाई, मुख्यत्यार प्रमोद फळदेसाई, सचिव विजय फळदेसाई आणि खजिनदार रामचंद्र फळदेसाई आदी विशेष परिश्रम घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: डबल राजयोग! 'या' 5 राशींचे बदलणार भाग्य; हा आठवडा ठरणार खास, कसा ते वाचा..

Vishwanath Dalvi: दळवींचे बंड शमल्यात जमा! पक्षातील एकीला दिले प्राधान्य; दामू नाईक यांनी काढली समजूत

Zomato platform fee hike: खवय्यांच्या खिशाला कात्री! झोमॅटोकडून प्लॅटफॉर्म फीमध्ये मोठी वाढ

VIDEO: 'वेलकम होम संजू सॅमसन'! चेन्नई सुपर किंग्जने शेअर केला खास व्हिडीओ, फॅन्स झाले इमोशनल

IPL 2026: चेन्नईची 'यलो आर्मी' संकटात! एकापाठोपाठ एक 'मॅचविनर' खेळाडू जखमी; 'कमबॅक'ची आशा धुळीस मिळणार?

SCROLL FOR NEXT