Goa Election: Devendra Fadnavis
Goa Election: Devendra Fadnavis Dainik Gomantak
गोवा

Goa Election: फडणवीसांपुढे उमेदवारी वाटपाचे आव्हान

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजपचे (BJP) नवे निवडणूक प्रभारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अनंत चतुर्दशीनंतर गोव्याच्या (Goa) दौऱ्यावर येणार आहेत. एका मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीसाठी अनेकजण इच्छुक असणे, ही सध्या पक्ष संघटनेसमोरील मोठी कटकट आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या पहिल्याच दौऱ्यात या विषयाला हात घातला जाणार आहे.

फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय नेते आहेत. यामुळे फडणवीस यांची नियुक्ती करून राज्यातील भाजपच्या राजकारणाची सारी सूत्रे अप्रत्यक्षपणे दिल्लीतील नेत्यांच्या ताब्यात सध्या गेलेली आहेत. गेल्या निवडणुकीवेळी दिल्लीतील नेत्यांनी काही विधानसभा मतदारसंघात उमेदवार बदलाची सूचना केली होती. मात्र, स्थानिक पातळीवर ठरवण्यात आलेला उमेदवार कायम राहावा, यासाठी आग्रह धरण्यात आला होता.

परिणामी केवळ 13 जागाच भाजपला जिंकता आल्या होत्या. मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील बहुतांश सहकारी त्यावेळी पराभूत झाले होते. या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भावनेच्या आधारावर उमेदवारीचा निर्णय न करण्याचे भाजपने ठरवल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे आजवर कोणीही आपली उमेदवारी परस्पर जाहीर करून टाकली असली तरी प्रत्यक्षात उमेदवारी जाहीर होईल, त्या वेळी नवा चेहरा समोर येण्याची शक्यता आहे. काही मतदारसंघांत धक्कादायकपणे संघटनेतील एखाद्या नावाची शिफारस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपने राष्ट्रीय पातळीवर आणि प्रदेश पातळीवर प्रत्येक मतदारसंघातील कमकुवत दुवे आणि बलस्थाने आणि संभाव्य उमेदवारी याबाबत सर्वेक्षण केले होते, तसेच त्याचा अहवाल तयार होत आलेला आहे. पहिल्या टप्प्यातील या अहवालावर सध्याचे कोणते आमदार निवडून येऊ शकतात आणि कोणत्या ठिकाणी थोडा भर दिला तर भाजपला विजय मिळू शकतो आणि कोणत्या ठिकाणी उमेदवार बदलण्याची खरीच गरज आहे, याविषयीची निश्‍चिती केली जाणार आहे. दर खेपेला विधानसभेमध्ये नवे चेहरे येण्याचे प्रमाण किती आहे त्यात भाजपचे किती नवे चेहरे असतात याचाही तौलनिक अभ्यास करण्यात आलेला आहे.

माहिती गोळा

फडणवीस यांनीही यापूर्वी गोव्यामध्ये राजकीय काम केले असल्याने आपल्या माहितगार सूत्रांकडून भाजपच्या एकंदर राजकीय परिस्थितीविषयी बरीच माहिती गेल्या आठवडाभरात गोळा केली आहे. या सगळ्या माहितीच्या आधारे भाजपच्या गाभा समितीची आणि प्रदेश कार्यकारिणीच्या प्रमुख सदस्यांची बैठक ते पणजीत घेतील.

"देवेंद्र फडणवीस यांनी‌ बिहारमध्ये उत्कृष्ट निवडणूक व्यवस्थापन केले आहे. यापुढे महत्त्वाच्या निर्णयात त्यांच्या मताला महत्त्व असेल."

- सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: 25 लाखांची सोन्याची बिस्किटे घेवून झाला फरार; पश्चिम बंगालमधून चोरट्याला अटक!

IndiGo Future Plan: इंडिगोचा मेगा प्लॅन, 100 छोटी विमाने ऑर्डर करण्याची एअरलाइन्सची तयारी

Dhargal Hit And Run Case: धारगळमध्ये तो अपघात नव्हे खूनच! उत्तर प्रदेशच्या दोघांना अटक

Lost From Beach: गोव्यात विविध बीचवरुन पाच मुले बेपत्ता; 'दृष्टी'ने घडवली कुटुंबियांशी पुन्हा भेट

Margao Session Court: वेश्याव्यवसायासाठी महिलांची खरेदी आणि पुरवठा केल्याप्रकरणी एकजण दोषी

SCROLL FOR NEXT