Development work maybe delayed due to election Dainik Gomantak
गोवा

पंचायतीच्या निवडणुकांमुळे गोव्यात विकासकामं लांबणीवर

आचारसंहिता उठल्याबरोबर पंचायत क्षेत्रात विकासकामे शक्य

दैनिक गोमन्तक

मडगाव : जून महिन्यात गोव्यात 186 पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सासष्टीतील वेगवेगळ्या पंचायतीचे सरपंच आणि पंच पंचायत क्षेत्रातील आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध विकास कामे करण्यास आसुसले आहेत, मात्र त्यासाठी त्यांना 10 मार्च 2022 या दिवसा पर्यंत वाट पहावी लागेल. कारण या दिवशी विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे व गोव्यात लागू केलेली आचारसंहिता त्या दिवशी उठणार आहे. (Development work maybe delayed due to election News Updates)

जानेवारी महिन्यात गोव्यातील (Goa) प्रत्येक पंचायतीला विकास कामासाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र त्यानंतर आचारसंहिता लागू केल्याने विकास कामे होऊ शकली नाहीत. राज्य सरकारने हा निधी केंद्र सरकारच्या 300 कोटी रुपयांच्या अनुदानातून पंचायतींना दिला होता. सासष्टीतील (Salcete) अनेक पंचायतीकडे आपल्या पंचायत क्षेत्रातील विकासासाठी अनेक प्रकल्प व योजना तयार आहेत. व विकास कामांचा आराखडा राज्य सरकारकडे सुपुर्द करण्यात आलेला आहे.

काही सरपंचांनी सांगितले, की जरी आचारसंहिता लागू आहे तरी त्यांनी राज्य सरकारकडे (Goa Government) संपर्क साधुन विकासकामासाठीचा मंजुर केलेला निधी पंचायतीकडे सुपुर्द करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. कारण आचारसंहिता उठवल्यावरही निधी पंचायत खात्यामध्ये जमा व्हायला उशीरच लागणार आहे. शिवाय जे सरकार सत्तेवर येईल त्यांच्या ध्येयधोरणावरही पुष्कळ काही अवलंबून असेल. आचारसंहिता उठल्याबरोबर पंचायती विकासकामाच्या निविदा प्रसिद्ध करणार आहेत. नंतर कामे वाटून दिल्यावर कंत्राटदारालाही काम पूर्ण करण्यासाठी वेळेची आवश्यकता असेलच असेही काही सरपंच म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: मडगावात शनिवारी वीजपुरवठा खंडित! 'या' भागांमध्ये चालणार दुरुस्तीचं काम

Bicholim: डिचोली 'राधाकृष्ण'मध्ये पोषक आहारावर कार्यशाळा उत्साहात; डिचोली रोटरी क्लबतर्फे आयोजन, प्रश्नमंजूषा स्पर्धेलाही प्रतिसाद

Goa Tourism: पर्यटन हंगामास सुरुवात; विदेशी पर्यटकांची संख्या घटली, देशी पर्यटकांत वाढ

Goa Crime: 45 दिवसांत 10 अल्‍पवयीनांची अपहरणे, दक्षिण गोव्यात घर सोडून जाण्याचे प्रकार वाढले

Goa Tiger Reserve Controversy: केंद्रीय सक्षम समितीचा 'तो' अहवाल दबाव तंत्राखालीच! व्याघ्र क्षेत्राविषयी पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT