Devdarshan Yatra  Dainik Gomantak
गोवा

Devdarshan Yatra: देवदर्शन योजना होणार एप्रिलपासून पूर्ववत- फळदेसाई

निधीची कमतरता : 12 हजार अर्ज प्रलंबित

गोमन्तक डिजिटल टीम

Devdarshan Yatra मुख्यमंत्री देवदर्शन योजनेसाठी ठेवण्यात आलेला निधी खर्च झाल्याने ही योजना तूर्त स्थगित ठेवण्यात आली आहे. आगामी अर्थसंकल्पात योजनेसाठी निधीची तरतूद केल्यानंतर एप्रिलपासून पुन्हा ती सुरू होईल, अशी माहिती समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

‘या योजनेसाठी सुमारे 12 हजारांहून अधिक अर्ज आले असून त्याची छाननी सुरू आहे. या मोफत योजनेचा लाभ एकदाच घेता येतो, अशी अट असूनही काहींनी दुसऱ्यांदा अर्ज केलेत’, असे मंत्री फळदेसाई म्हणाले.

विशेष नागरिकांसोबत सहायकाला जाण्याची सूट असल्याने त्याचा अनेक विकलांग नागरिकांनीही लाभ घेतला आहे, अशी माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. योजना अगोदर ज्येष्ठ नागरिकांसाठी होती.

मात्र, 50 वर्षांवरील नागरिकांना त्याचा लाभ घेता येत आहे. लाभ घेतलेल्यांनी दुबार अर्ज केल्याने ते बाद ठरविले जात असून त्यामुळे छाननीसाठी वेळ लागत आहे. सरकारची ही लोकप्रिय योजना असून ती सुरू व्हावी अशी समस्त जनतेची अपेक्षा होती, ती पूर्ण होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT