Ganesh Chaturthi  Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi 2024: राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्ती बंदी कागदापुरती..?

गोमन्तक डिजिटल टीम

तिसवाडी: प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) गणेशमूर्ती विक्रीवर बंदी असली राज्यात अनेक ठिकाणी या मूर्तींची उघडरीत्या विक्री केल्या जात असल्याचा विषय आल्यानंतर विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले. तसेच या मूर्ती गोव्यात आत शिरणारच नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु ही आश्वासने पूर्वी देखील दिली असून खरोखरच कारवाई केली जाईल, यावरून संभ्रम निर्माण झाला आहे.

पीओपी गणेश मूर्ती ही पर्यावरणासाठी हानिकारक असून त्यांची विक्री करण्यास बंदी घातली होती, परंतु हा आदेश केवळ कागदापूर्ती मर्यादित राहिला आहे. राजधानी पणजीत देखील या मूर्तींची विक्री केली जाते, असे काही गणेशभक्तांनी सांगितले.

मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी विधानसभेत जाहीर केले आहे की, या विरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करणार आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उलट काणाडोळा होत असल्याची टीका पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पीओपीच्या मूर्ती बाहेरून येत असून आपण पोलिस खात्याला आदेश देऊन त्या गोव्याच्या सीमेवर अडवणार असल्याचे सांगितले आहे.

परंतु यापूर्वीच्या ज्या मूर्ती गोव्यात पोचल्या आहेत. तसेच काही गणेश चित्रशाळेत चोरीचुपके पीओपीच्या मूर्ती तयार केल्या जातात त्यावर सरकार काय कारवाई करणार याबाबत सरकारने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यासाठी गणेश चित्रशाळा तसेच विक्री केंद्रांची झडती घेणे आवश्‍यक आहे. सरकार हे पाऊल उचलणार का, याबाबत गणेशभक्तांना संशय आहे.

गेल्या वर्षी देखील असेच आश्वासन सरकारने दिले होते, परंतु हजारोच्या संख्येत पीओपी मूर्ती गोव्यात येऊन लोकांनी त्या खरेदीही केल्या, परिणामी विसर्जित केल्यानंतर जलस्रोत प्रदूषित झाले. सरकार खरोखरच गंभीर असेल, तर कागदी घोडे न नाचवता आतापासूनच कडक कारवाई सुरू झाली पाहिजे.
राजेंद्र केरकर, पर्यावरण कार्यकर्ता
पीओपी मूर्तीवर कारवाई करण्याची तयारी तीन महिन्यापूर्वी करण्याची आवश्यकता होती. शेवटच्या क्षणी मूर्ती न मिळाल्यास लोक पीओपी घेणार, निदान पुढील वर्षी ही स्थिती येणार नाही, यासाठी चिकण मातीची मूर्ती घडवणाऱ्यांना प्रोत्साहन देऊन या आदेशाची अंमलबजावणी करावी.
अभिजित प्रभुदेसाई, पर्यावरण कार्यकर्ता
पीओपी मूर्ती विक्रीवर सरकारला नियंत्रण ठेवले कठीण आहे, कारण हजारोच्या संख्येत मूर्ती राज्यात दाखल होतात. सीमेवर मूर्ती येतील, तेव्हा अधिकाऱ्यांच्या हातावर पंचखाद्य ठेवल्यानंतर प्रवेश दिला जाईल. कडक अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा नाही. परिणामी बंदी शक्य नाही.
रमेश गावस, पर्यावरण अभ्यासक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT