Goa Police
Goa Police  Dainik Gomantak
गोवा

Goa Police: दहा उपअधीक्षकांचा बढतीचा मार्ग मोकळा

दैनिक गोमन्तक

Goa Police: चार महिलांसह 10 उपअधीक्षकांना अधीक्षकपदी बढती देण्यासाठी गोवा लोकसेवा आयोगाने बढती प्रक्रियेच्या मुदतीत शिथिलता दिली होती व आता त्यांच्या बढतीसाठी गोवा लोकसेवा आयोगाने शिफारस केल्याने या अधिकाऱ्यांचा बढतीचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकत्याच झालेल्या खात्यांतर्गत बढती समितीच्या बैठकीत आयोगाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

या खात्यांतर्गत बढती समितीच्या अध्यक्षस्थानी आयोगाचे अध्यक्ष मान्युएल नोरन्हा तसेच पोलिस महासंचालक जसपाल सिंग व आयएएस अधिकारी सुभाष चंद्रा हे सदस्य म्हणून उपस्थित होते. पोलिस अधीक्षक बढतीसाठी शिफारस करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये उपअधीक्षक मारिया मोन्सेरात, गुरुदास गावडे, एडविन कुलासो, नेल्सन अल्बुकर्क, सुचेता देसाई, एझिल्डा डिसोझा, सुनिता सावंत, राजेंद्र देसाई, धर्मेश आंगले व किरण पौडवाल यांचा समावेश आहे.

गोवा पोलिस सेवेत उपअधीक्षक पदाच्या बढतीसाठी रिक्त असलेल्या जागांपैकी 60 टक्के खात्यांर्गत बढतीनुसार तर 40 टक्के थेट नियुक्तीसाठी गोवा लोकसेवा आयोगाने मान्यता दिली आहे. या आयोगाने जलसंपदा खात्यातील प्रोबेशनवर असलेल्या अधिकाऱ्यांना नियमित करण्यात आले आहे तसेच एका अधिकाऱ्याला कुशल विकास व प्रशिक्षण खात्यामध्ये प्राचार्य म्हणून बढती देण्यास मान्यता दिली आहे.

* नियमामध्ये शिथिलता

अधीक्षकपदाच्या बढतीसाठी सेवेत असलेल्या उपअधीक्षकाने किमान सहा वर्षे या पदावर असणे गरजेचे आहे, मात्र हल्लीच सरकारने त्यांच्या नियमामध्ये शिथिलता केली होती व आयोगाने त्याला मान्यता दिली होती. या उपअधीक्षकांनी खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तसेच ‘जिपार्ड’ (Gippard) मध्ये 45 दिवसांचे प्रशिक्षणही पूर्ण केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT