Goa Students |ABVP Protest
Goa Students |ABVP Protest Dainik Gomantak
गोवा

ABVP Protest: विद्यार्थी परिषद स्थापन करण्यासाठी ‘झेवियर्स’ प्रशासनाला 5 दिवसांची मुदत

दैनिक गोमन्तक

ABVP Protest: म्हापसा येथील सेंट झेवियर्स कॉलेजमधील विद्यार्थी परिषदच्या स्थापनेची तारीख ठरविण्यासाठी बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कॉलेज प्रशासनाच्या व्यवस्थापनास पाच दिवसांची मुदत दिली आहे.

येत्या 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2023 च्या दरम्यान हा औपचारिक पदग्रहण सोहळा पार पाडावा, असे निर्देश दिले आहेत.

मंगळवारी (ता. 24) दुपारी बार्देश उपविभागीय दंडाधिकारी आयएएस यशस्वविनी बी. यांच्या अध्यक्षतेखाली म्हापसा सेंट झेवियर्स कॉलेज प्रशासन व कॉलेज विद्यार्थी परिषदेच्या तीन विद्यार्थ्यांची संयुक्त बैठक झाली. सुमारे तासभर चाललेल्या या बंद दाराआड बैठकीस शिक्षण खात्याचे दोन प्रतिनिधीही उपस्थित होते.

बैठकीनंतर माध्यमांसमोर बोलताना सेंट झेवियर्स कॉलेजचा सरचिटणीस (जीएस) साहिल महाजन म्हणाले की, उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसोबत आमची संयुक्त बैठक झाली.

बैठकीत दंडाधिकाऱ्यांनी कॉलेज प्रशासनाच्या व्यवस्थापनाला 24 जानेवारी ते 28 जानेवारी या पाच दिवसांत पदग्रहण सोहळ्याची तारीख जाहीर करण्यास सांगितले आणि 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत हा औपचारिक पदग्रहण कार्यक्रम पार पाडावा असे निर्देश दिले आहेत.

या बैठकीस कॉलेज जीएस साहिल महाजन, वर्ग प्रतिनिधी असलेले विनय राऊत, शिवानी वायंगणकर हे तिघेजण विद्यार्थी हजर होते, तर कॉलेज प्रशासनातर्फे प्राचार्य डॉ. ब्लँच मस्कारेन्हास, या कॉलेजचे व्यवस्थापक फादर टोनी सालेमा व कॉलेजचे अ‍ॅडव्होकेट उपस्थित होते.

याशिवाय पोलिस निरीक्षक परेश नाईक हे हजर होते. दरम्यान, बैठक संपल्यानंतर माध्यमांनी कॉलेज प्रशासनाचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न केला असता संबंधित प्रतिनिधींनी प्रतिसाद दिला नाही.

मी सरचिटणीस म्हणून जिंकून आलोय. त्यामुळे कॉलेज प्रशासनाने औपचारिक कार्यक्रम घेत माझ्यासह विद्यार्थी परिषद मंडळाचा अधिकारग्रहण सोहळा करावा अशी आमची मागणी होती. त्यानुसार हा उठाव केला होता.

या पदग्रहण सोहळ्यास याआधीच 27 दिवसांचा विलंब झाला आहे. गोवा विद्यापीठाच्या नियमांनुसार दहा दिवसांत हे पदग्रहण होणे अनिवार्य असते, असे साहिल महाजन यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT