Goa Taxi Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi App : गोवा टॅक्सी ॲपला अजूनही कार व्यावसायिकांचा नकार ; वाहतूक खात्याचा दावा

ज्यांना गोवा टॅक्सी ॲपअंतर्गत काम करायचे आहे, त्यांनी वाहतूक खात्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Taxi App : पणजी, वाहतूक खात्याने गोवा टॅक्सी ॲप पूर्ण क्षमतेने वापरण्यास परवानगी देण्याचे निश्‍चित केले आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल, असा खात्याचा दावा असला, तरी पारंपरिक टॅक्सीचालकांनी हे ॲप वापरण्यास ठाम नकार दर्शविला आहे.

वाहतूक खात्याचे साहाय्यक संचालक फ्रान्सिस्को वाझ यांनी सांगितले की, ज्यांना गोवा टॅक्सी ॲपअंतर्गत काम करायचे आहे, त्यांनी वाहतूक खात्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

जेव्हा हे ॲप लॉन्च केले, तेव्हा ४५० पेक्षा कमी नोंदणीकृत टॅक्सी ऑपरेटर होते, म्हणून त्यांना ॲप वापरण्यासाठी अंशत: परवानगी दिली होती. पण आता ४५० टॅक्सी ऑपरेटरचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे आम्ही त्यांना ॲप पूर्ण क्षमतेने चालवण्याची परवानगी देऊ.

आम्ही इतर टॅक्सीचालकांना या ॲपअंतर्गत काम करण्यास सांगितले; परंतु अनेकांनी नकार दिला, असे वाझ यांनी स्पष्ट केले..

ॲपची गरज नाही!

काळी-पिवळी टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनील नाईक म्हणाले की, काळी-पिवळी टॅक्सी या पॉइंट टू पॉइंट सेवेला राज्य सरकारची मान्यता आहे. आम्ही गेल्या २० वर्षांपासून हे टॅक्सी काऊंटर चालवत आहोत.

करमळी रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना आम्ही चांगली सेवा देतो. प्रवाशांनाही टॅक्सी भाड्याने घेण्यासाठी कोणत्याही ॲपची आवश्‍यकता भासत नाही. सरकारला हे ॲप टॅक्सीचालकांवर लादायचे असेल तर आम्हाला सरकारी नोकऱ्या द्या आणि या टॅक्सी घ्या, असे ते म्हणाले.

सरकारचा हस्तक्षेप नको!

टुरिस्ट टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष चेतन कामत म्हणाले की, आम्ही कोणत्याही स्थितीत गोवा टॅक्सी ॲपअंतर्गत काम करणार नाही. आम्हाला टॅक्सी व्यवसाय मुक्तपणे करायचा आहे.

अ‍ॅपअंतर्गत आमचे पैसे तिसऱ्या व्यक्तीला द्यायचे आणि मग आमच्या बँक खात्यात पैसे येण्याची वाट पाहायची का? सरकार टॅक्सी व्यवसायात हस्तक्षेप करत आहे, हे योग्य नाही.

या ॲपबद्दल माहिती नसलेल्या वृद्ध व्यक्तींचे काय? ते ॲपअंतर्गत व्यवसाय कसा करतील, असाही प्रश्‍न कामत यांनी केला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT