Bhoma Road Dainik Gomantak
गोवा

Goa Highway: भोम महामार्गाला अडथळा ठरणार प्राचीन मंदिरांसह दाट लोकवस्ती

Goa Highway: भोम महामार्गाच्या रुंदीकरणासाठी प्रस्तावित क्षेत्र दाट लोकवस्तीचे आहे. तेथे उच्च दाबाच्या व भूमिगत वीज, गॅस, जल आदी वाहिन्या आहेत. या भागात चार मंदिरे असून त्यापैकी काही मंदिरे आठव्या आणि तेराव्या शतकातील आहेत. काही निवासी घरे 100 वर्षांपासून अस्तित्वात आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Highway: भोम महामार्गाच्या रुंदीकरणासाठी प्रस्तावित क्षेत्र दाट लोकवस्तीचे आहे. तेथे उच्च दाबाच्या व भूमिगत वीज, गॅस, जल आदी वाहिन्या आहेत. या भागात चार मंदिरे असून त्यापैकी काही मंदिरे आठव्या आणि तेराव्या शतकातील आहेत. काही निवासी घरे 100 वर्षांपासून अस्तित्वात आहेत.

काही पोर्तुगीजकालीन घरे आहेत. यासाठी महामार्ग या भागातून न नेता पडीक जमिनीमधून न्यावा, अशी भोम येथील याचिकादारांची मागणी असून तसे निर्देश संबंधितांना द्यावेत, अशी विनंती न्यायालयाला केली आहे.

जमीन संपादनाचा आक्षेप सक्षम प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी 3 जानेवारी 2023 रोजी फेटाळला होता. या आदेशाला व रस्ता रुंदीकरणासंदर्भातील प्रक्रियेला याचिकादारांनी खंडपीठात आव्हान दिले आहे.

महामार्ग रुंदीकरणाबाबत यापूर्वीही प्रक्रिया सुरू झाली होती. त्याला जमीनमालकांनी आक्षेप घेतल्यामुळे ती रद्द केल्याचा मुद्दा मांडला.

याचिकादारांनी या अधिसूचनेला 28 सप्टेंबर आणि 2 नोव्हेंबर 2022 रोजी लेखी आक्षेप नोंदवून आव्हान दिले होते. या महामार्गाच्या विरोधात स्थानिकांनी आतापर्यंत अनेकदा आंदोलने छेडली आहेत.

गोवा खंडपीठात याचिका

भोम येथील महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी डॉ. एरविन डिसा यांच्यासह 57 नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका सादर केली असून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय, राज्य सरकार, सार्वजनिक बांधकाम खाते (पीडब्ल्यूडी - राष्ट्रीय महामार्ग), विशेष जमीन संपादन अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जमीन संपादनाचे सक्षम प्राधिकरणाचे अधिकारी यांना प्रतिवादी केले आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

Freedom 4.0: 'Gen Z'ला जोडण्यासाठी चर्चचा नवा प्रयोग; पारंपरिक खेळ, संगीतातून साधणार संवाद

SCROLL FOR NEXT