Goa Dengue Spread : 2021 सालच्या तुलनेत यंदा राज्यातील डेंग्यूची साथ नियंत्रणात असली तरी ऑगस्ट महिन्यात काही भागांमध्ये डेंग्यूच्या साथीचा फैलाव झाल्याचे दिसून आले. ऑगस्टमध्ये एकट्या बार्देश तालुक्यात 58 रुग्ण आढळल्याने डेंग्यूची धास्ती वाढली आहे.
यातील सर्वाधिक रुग्ण कांदोळी परिसरात आढळले असून पर्यटन उद्योगाच्या कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जुलैमध्ये कळंगुट-कांदोळी परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्याने साथीच्या रोगांचा फैलाव होत असल्याचा धोका आरोग्य खात्याने सूचित केला होता.
पंचायत निवडणुकीचा स्वच्छतेत खोडा!
ऑगस्टमध्ये कांदोळीत डेंग्यूचे 26 रुग्ण आढळले होते. तर म्हापसा 11, कोलवाळ 10, हळदोणे 8 आणि शिवोलीत 3 अशी रुग्ण संख्या होती. पंचायत निवडणुकीच्या कामात कर्मचारी व्यस्त असल्याने साफसफाईच्या कामात अडथळे निर्माण झाले. तसेच करासवाडा, हळदोणे येथे परप्रांतीय मजुरांना डेंग्यूचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. पावसाच्या लहरीपणामुळेही रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ झाली, अशी माहिती डॉ. महात्मे यांनी दिली.
स्वच्छता हाच उपाय : डॉ. महात्मे
डेंग्यूशी दोन हात करण्यासाठी आरोग्य खात्याने आता जनजागृतीवर भर दिला आहे. गेल्या वर्षापासून विशेष उपक्रम हाती घेतले असून यात लोकांनाही सहभागी करून घेतले जात आहे. लोकांनी स्वतःहून आपला परिसर स्वच्छ ठेवला तर डेंग्यूविरोधी मोहीम यशस्वी होईल, असे डॉ. कल्पना महात्मे म्हणाल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.