Dengue In Goa Dainik Gomantak
गोवा

Dengue In Goa : कामगार वस्त्यांत डेंग्‍यूचे डास सक्रिय

Dengue In Goa डॉ. कल्‍पना महात्‍मे : उघड्यावर पाणी साचल्याने साथ

गोमन्तक डिजिटल टीम

Dengue In Goa : मडगाव, राज्‍यात डेंग्‍यूची साथ नियंत्रणात येत असली तरी वास्‍को, कुठ्ठाळी आणि वेर्णा या तीन ठिकाणी जिथे मोठ्या प्रमाणावर कामगार वस्‍ती आहे, तिथेच डेंग्‍यूचे डास अजून सक्रिय असल्‍याचे दिसून आले आहे.

याचे महत्‍वाचे कारण म्‍हणजे, उघड्यावर साठवून ठेवलेले पाणी हेच असल्‍याचे उघड झाले आहे. हे पाणी साठवून ठेवण्‍यास आवश्‍‍यक असलेले उपाय न घेतल्‍यामुळेच पाऊस संपूनही या भागात डेंग्‍यू सक्रिय आहे.

न्‍यू वाडे, वास्‍को येथील एका सहा वर्षीय मुलीला अालेला मृत्‍यूही याच कारणामुळे असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

नवेवाडे वास्‍को येथील वाणी खानापूर या सहा वर्षीय बालिकेचा डेंग्‍यूने मृत्‍यू झाल्‍यामुळे ही साथ पुन्‍हा एकदा चर्चेत आली आहे. केवळ कामगार वस्‍तीतच जिथे उघड्यावर पाणी साठवून ठेवले जाते, अशाच वस्‍तींमध्‍ये डेंग्‍यूची प्रकरणे जास्‍त दिसून येत आहेत. यामुळे आता आरोग्‍य खात्‍याने अशा कामगार वस्‍तींवर लक्ष केंद्रीत केले आहे.

गोवा राज्‍य साथीचे रोग निवारण विभागाच्‍या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्‍पना महात्‍मे यांनी दिलेल्‍या माहितीप्रमाणे, पावसाळा संपल्‍यामुळे डेंग्‍यूची साथ ओसरली आहे. यापूर्वी चिंबल, कळंगुट, कांदोळी, पेडणे या भागात डेंग्‍यूचे रुग्‍ण मोठ्या प्रमाणात सापडत होते.

मात्र हे प्रमाण आता बरेच कमी झाले असून जिथे यापूर्वी ३० ते ३५ रुग्‍ण सापडायचे तिथे आता अभावानेच तीन ते चार रुग्‍ण सापडतात. तरी कुठ्ठाळी येथील २० कलमी कार्यक्रमांतर्गत उभारलेली वस्‍ती, न्‍यू वाडे-वास्‍को आणि वेर्णा येथील माऊंट मेरी या वस्‍तींत काही प्रमाणात रुग्‍ण सापडले आहेत. ज्‍या सहा वर्षीय मुलीला दुर्दैवी मृत्‍यू आला ती मुलगीही न्‍यू वाडे वास्‍को या भागात रहाणारी असून ती जिथे रहाते तिथे दाटीवाटीने घरे आहेत,असेही त्यांनी सांगितले.

‘त्‍या’ मुलीचा रक्‍तदाब उतरल्‍याने मृत्‍यू

चिखली आरोग्‍य केंद्रात वाणी खानापूर या मुलीला तपासण्‍यात आले, तेव्‍हा सुद्धा तिची प्रकृती चांगली होती. त्‍यावेळी सुद्धा तिथे तिच्‍या रक्‍तातील प्लेटलेटस्‌चे प्रमाण एक लाखापेक्षा जास्‍त होते, पण गोमेकॉत दाखल केल्‍यानंतर तिची प्रकृती काही प्रमाणात ढासळू लागली.

तिला पोटदुखी सुरू झाली. अशातच तिचा रक्‍तदाब ९०/६० एवढा खाली उतरला. रक्‍तदाब अचानक खाली उतरल्‍यामुळेच तिला मृत्‍यू आला, अशी माहिती डॉ.कल्पना महात्मे यांनी दिली.

ज्‍या चिखली आरोग्‍य केंद्रात त्‍या दुर्दैवी मुलीला दाखल करण्‍यात आले होते तिथेही डेंग्‍यूचे जास्‍त रुग्‍ण नाहीत. जेव्‍हा पाऊस जोरदार होता त्‍यावेळी दिवसाला या केंद्रात डेंग्‍यूचे २० ते २५ रुग्‍ण तपासले जायचे. मात्र आता हे प्रमाण दिवसाला तीन ते चार प्रकरणे एवढे खाली उतरले आहे.

- डॉ.कल्पना महात्मे, वैद्यकीय अधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT