Vasco Viral Video of Fight between two groups
Vasco Viral Video of Fight between two groupsDainik Gomantak

Vasco Viral Video: वास्कोत गँगवर? पोलिसांवर हल्ला? काय आहे त्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य...

माध्यमांनी अशा घटनांवर विश्वास ठेऊ नये; कपिल नायक
Published on

Vasco Viral Video of Fight between two groups

एकीकडे दिवाळीची धामधूम सुरू असताना शनिवारी वास्कोमध्ये दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या व्हिडिओमध्ये पोलिसांची गाडी दिसत असूनही पोलिसांना न जुमानता काहीजण एकमेकांना मारताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वास्कोमध्ये गॅंगवॉर झाले असल्याची, तसेच पोलिसांवर हल्ला झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी सर्वत्र पसरत आहे.

Vasco Viral Video of Fight between two groups
Goa News: नरकासूर स्पर्धेवरुन काँग्रेसचा ढवळीकरांवर निशाणा

याबाबत वास्को पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक कपिल नाईक यांनी दिलेला माहितीनुसार, वास्कोमध्ये गॅंगवॉर झाले नसून किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये मारामारी झाली. दिवाळी सणानिमित्त सर्वत्र वाहतूक कोंडीची समस्या आपल्याला पाहायला मिळते.

यावेळी एका चारचाकीच्या मागे असलेली दुचाकी पुढे जाण्यासाठी मार्ग काढत होती. यावेळी सतत हॉर्न वाजवूनही चारचाकीस्वार पुढे जात नसून तसेच आपल्याला पुढे जायला वाट देत नसल्याने दोन्ही चालकांमध्ये सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली.

नंतर विषय वाढत गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये इतर काहीजणही जोडले गेले आणि या हाणामारीची तीव्रता वाढली. दरम्यान, वेळीच पोलिसांना बोलवण्यात आले. पोलीस सदर भांडणात दोन्ही गटांना वेगवेगळे करत असताना त्यांना थोडी दुखापत झाली पण पोलिसांवर कोणीही हल्ला केला नाही.

या घटनेमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना आम्ही ताब्यात घेतले असून, काहीजण फरारही झाले आहेत ज्यांचा आम्ही शोध घेत आहोत.

मी असेपर्यंत वास्कोमध्ये गँगवर होणार नाही : कपिल नायक

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वास्कोमध्ये गँगवर असे सर्वत्र पसरले. याबाबत नायक म्हणाले की, हे गँगवर नव्हते. मी असेपर्यंत gaगँगवर होऊ देणार नाही.

व्हायरल व्हिडिओमार्फत समाजामध्ये नकारात्मकता पसरवू नका...

यावेळी कपिल नायक यांनी सर्वांना आवाहन केले की, असे व्हिडिओ व्हायरल करून अनेकदा काही समाजकंटक नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे घटनेची तीव्रता अधिक वाढवून अर्थाचा अनर्थ होतो.

मी अशा लोकांना आवाहन करतो की कोणत्याही प्रकारचे असे व्हिडिओ व्हायरल करू नये. त्याप्रमाणेच मी पत्रकार बांधवांना आणि माध्यमांनाही आवाहन करतो की, अशा कोणत्याही घटनेवर विश्वास न ठेवता संबंधित अधिकारी किंवा पोलिसांकडून अधिकृत माहिती घेऊनच बातम्या कराव्यात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com