Dengue in Goa Dainik Gomantak
गोवा

Dengue In Goa: पुन्हा डेंग्यूचे थैमान! कुटबणमध्ये अकरा परप्रांतीयांना लागण

Goa Dengue Cases: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या चार परप्रांतीय कामगारांत डेंग्यूची लक्षणे आढळली असल्याचे समजते

गोमन्तक डिजिटल टीम

कुंकळळी: कुटबण भागात मासेमारी बंदरावर काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून कुटबण भागात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा फैलावा झाला असल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. आत्तापर्यंत अकरा कामगारांना या रोगाची लागण झाल्याचे तपासणीत सिद्ध झाले आहे. काही कामगारांना डेंग्यूची लक्षणे आढळल्याने त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत.

कुटबण जेटीवरील विविध मच्छीमारी बोटींवर सुमारे चार हजार कामगार काम करतात. या कामगारांना कामावर रुजू होण्यापूर्वी सर्व तपासण्या करणे सक्तीचे आहे. असे असले तरी काही बोटमालक आपल्या कामगाराची तशी तपासणी करीत नाहीत. यापूर्वी कुटबण जेटीवर अशाचप्रकारे डेंग्यूचा फैलाव होऊन दोघांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा डेंग्यू पसरल्यामुळे स्थानिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या चार परप्रांतीय कामगारांत डेंग्यूची लक्षणे आढळली असल्याचे समजते. बाळ्ळी आरोग्य केंद्राच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी कुटबण भागात भेट देऊन रक्ताचे नमुने गोळा केले व फवारणीचे काम हाती घेतले आहे. आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सहाजणांना डेंग्यूची लागण झाल्याचे माहिती दिली , तरी सुमारे बारा डेंग्यूचे रुग्ण असल्याचा दावा स्थानिक करत आहेत.

फैलाव रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय

डेंग्यू रोगाची लक्षणे आढळून आल्यामुळे कुटबण भागात बाळ्ळी आरोग्य केंद्राने तपासणी कार्य सुरू केले आहे. त्याचबरोबर डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय आखण्यात आले असल्याचे आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी सांगितले. आणखी डेंग्यूचे रुग्ण आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक प्रभागात व विशेष करून मच्छीमार बोटींवर काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराची तपासणी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

SCROLL FOR NEXT