Football  Dainik Gomantak
गोवा

Indian Super League: धेंपो क्लबचा शानदार विजय; बंगळूरु युनायटेडला नमवले

Dempo Sports Club defeated FC Bangalore United by 2-1: माजी विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबने बुधवारी आय-लीग 2 फुटबॉल स्पर्धेत महत्त्वपूर्ण विजयाची नोंद केली.

Manish Jadhav

Indian Super League Football Tournament: आय-लीग फुटबॉल स्पर्धेसाठी पात्रतेचा दावा कायम राखताना माजी विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबने बुधवारी आय-लीग 2 फुटबॉल स्पर्धेत महत्त्वपूर्ण विजयाची नोंद केली. त्यांनी बलाढ्य एफसी बंगळूर युनायटेडला 2-1 फरकाने नमवले. हा सामना बंगळूरु येथे झाला.

दरम्यान, सामन्याच्या पूर्वार्धात अर्ध्या तासात दोन गोल केल्यानंतर धेंपो क्लबने विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले. नेसियो फर्नांडिस याने 18 व्या मिनिटास माजी आय-लीग विजेत्यांचे गोलखाते उघडले. नंतर 31व्या मिनिटास राहुलकुमार पासवान याने गोव्याच्या संघाची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. 59 व्या मिनिटास ऋषभ डोब्रियाल याने बंगळूरु युनायटेडची पिछाडी एका गोलने कमी केली.

दुसरीकडे, या विजयासह समीर नाईक यांच्या मार्गदर्शनाखालील धेंपो क्लबने स्पर्धेत सलग पाच सामने अपराजित राहण्याचा पराक्रम साधला. यामध्ये चार विजय आणि एका बरोबरीचा समावेश आहे. धेंपो क्लबचा पुढचा सामना बंगळूरु येथेच स्पोर्टिंग क्लब बंगळूरुविरुद्ध सहा एप्रिल रोजी होईल. स्पर्धेत बुधवारी आणखी दोन सामने झाले. दिल्ली येथे सुदेवा दिल्ली एफसीने युनायटेड स्पोर्टस क्लबला 1-0 असे नमवले, तर स्पोर्टिंग क्लब बंगळूरुने ऑरेंज एफसीवर 2-0 असा विजय नोंदवून अग्रस्थान मिळवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

SCROLL FOR NEXT