I League Football Dainik Gomantak
गोवा

I League Football: धेंपो क्लबने एफसी गोवास नमविले

द्वितीय विभाग आय-लीग; उत्तरार्धात दोन्ही संघांचे सामर्थ्य दहा खेळाडूंवर

किशोर पेटकर

I League Football : धेंपो स्पोर्टस क्लबने द्वितीय विभाग आय-लीग फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या विजयाची नोंद करताना एफसी गोवा डेव्हलपमेंट संघावर 3-0 अशा फरकाने मात केली. ‘ड’ गटातील सामना शनिवारी नागोवा पंचायत मैदानावर झाला.

(Dempo Sports Club defeat FC Goa)

सामन्याच्या उत्तरार्धात एफसी गोवा आणि धेंपो क्लबला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. एफसी गोवाच्या व्हेलरॉय फर्नांडिस याला 50 व्या मिनिटास रेड कार्ड मिळाले, त्यानंतर 51 व्या मिनिटास सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे धेंपोच्या गौरव काणकोणकर याला मैदान सोडावे लागले.

मात्र त्यापूर्वीच धेंपो क्लबने दोन गोलची आघाडी घेतली होती. हे दोन्ही गोल करणारा बेनेस्टन बार्रेटो धेंपो क्लबच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने अनुक्रमे 12 व 36 व्या मिनिटास गोल नोंदविला. अन्य एक गोल महंमद अली याने 66 व्या मिनिटास केला.

धेंपो क्लब संघ आता स्पर्धेत सात सामने खेळला असून तीन विजय, दोन बरोबरी व दोन पराभव या कामगिरीसह त्यांचे 11 गुण झाले आहे. एआरए एफसी व अंबरनाथ युनायटेड या संघांचेही तेवढेच गुण आहेत.

गोलसरासरी +2 अशी कमी असल्यामुळे गोव्यातील संघ पाच संघाच्या गटात तिसऱ्या स्थानी आहे. एफसी गोवास चौथा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सहा सामने खेळल्यानंतर त्यांचे चार गुण कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईला आम्ही कंटाळलो! 'गोवा काँग्रेस पक्ष' नोंदणी प्रक्रियेसंदर्भात कोर्ट नाराज

VIDEO: वकिलाची गाडी अडवून मारहाण अन् शिवीगाळ, आमदार पुत्राची गुंडगिरी; तक्रारीनंतरही FIR नाही, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल!

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये मृत्यूचं भयानक तांडव! गजबजलेल्या बाजारात अचानक हवाई हल्ला; 49 जणांचा मृत्यू; 58 जखमी, थरारक VIDEO समोर

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

SCROLL FOR NEXT