मिशन फॉर लोकल च्या बेनराखाली कार्यकर्त्यांचे शक्ती प्रदर्शन Dainik Gomantak
गोवा

जुन्या भाजपा कार्यकर्त्यांचे कोरगावात मिशन फॉर लोकल च्या बेनराखाली शक्ती प्रदर्शन

दैनिक गोमन्तक

मोरजी: गुरुवारी मगोचे संभाव्य उमेदवार प्रवीण आर्लेकर (Praveen Arlekar) यांनी कोरेगाव येथे कमलेश्वर देवाला नारळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ करताना शक्ती प्रदर्शन केले होते ,ही बातमी ताजी असतानाच मिशन फॉर। लोकलचे सर्वेसर्वा आणि पेडणे मतदार संघातील जुने भाजपा (BJP) कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राजन कोरगावकर यांच्या समर्थकांचे कोरगाव येथे 24 रोजी भूमिका मंदिर प्रांगणात सभेचे आयोजन केले होते .

ही सभा आयोजन करण्यामागे भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांची मागणी होती की राजन कोरगावकर यांना भाजपाची उमेदवारी द्यावी ,त्यानुसार हे शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते. या सभेला पेडणे मतदार संघातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते .मिशन फॉर लोकलने (Mission for Local) मागच्या एक वर्षासपासून आपले कार्य मतदार संघातून सुरू केले होते ,घरोघरी जाऊन लोकमत जसनुन घेण्याचे काम करत असताना त्यांनी असता पर्यंत मिशन फॉर लोकल संघटनेने केलेल्या उपक्रमाची छापील माहिती पत्रका द्वारे पोचवलेली आहे .

रंगनाथ कलशावकर

जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर (Ranganath Kalshavkar) यांनी बोलताना रोजगार आमदारकडून मिळणे अशक्य असल्याने आम्ही आता स्थानिक उमेदवार तालुक्यातला हवा होता म्हणून आम्ही त्यांना पुढे घेऊन जाणार ,राजन कोरगावकर हे सुशिक्षित आहे इतर उमेदवार सुशिक्षित नाही ,पेडणेची (Padane) कायापालट करूया आणि आमदार मंत्रिपदाची खुर्ची देऊया असे आवाहन केले ,हीच संधी योग्य आहे प्रत्येकाने मतदान करून राजन कोरगावकर यांना विजयी करावे असे आवाहन केले.

राजन कोरगावकर

मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर (Rajan Korgaonkar) यांनी बोलताना आजचा दिवस हा गावातील गावकऱ्यांमुळे घडला ,सभेला येऊन तुम्ही जो वेळ दिला त्यासाठी आपण 365 दिवस वेळ देईल ,बाबू आजगावकर पंच महिला सदस्यांवर अत्याचार केला ,पंचायतीच्या मंडळामुळे आपण घडलो ,बाबू आजगावकर तुला शोभत नाही स्वाभिमानी नागरिक तुला तुझी जागा दाखवून देणार मिशन चे कार्य हेच आहे अत्याचारी मांणसाविरोधात आता स्वाभिमानी पेडणेकर धडा शिकवणार असे सांगितले . आपण स्थानिक आहोत ,तुम्ही गुलामगिरीत आम्हाला ठेवले आता विचार बदल एकता हीच त्यांना धडा शिकवणार असे सांगितले ,बाबू फटींगिरी करत आहे विकास फटींगिरी करून केला मेरा पेडणेचा माणसाचा विकास केला नाही . जी खाती आहे त्यातून काहिच केले नाही. आता आणखी पाच वर्षे बाबूंना देऊ नये ,अधिकार असून काहीच केले नाही आता पाच वर्षात कसल्या नोकऱ्या देतील असा सवाल उपस्थित केला. घरा बांधून निवडणुकीला (election) उभे राहू पाहत आहे त्यांना संधी देऊ नये असे आवाहन केले.

भाजपचे जेष्ठ जुने कार्यकर्त्यांची उपस्थिती

पेडणे भाजपा (BJP) मंडळ माजी अध्यक्ष दाजी कासकर ,गुंडू राऊळ ,रोहिदास भाटलेकर , माजी सरपंच पंढरी आरोलकर ,कृष्णा गावडे विश्वास नारोजी सुदन बर्वे ,रश्मी शेट्ये, कृष्णा गावडे आदी ची उपस्थिती लोकांचे लक्ष केंद्रित करत होते .

पाच पंच सदस्य उपस्थित

कोरगावचे पंच अब्दुल नाईक ,पंच कुस्तान कुऍलो,पंच उदय पालयेकर ,पंच वसंत देसाई शिवाय जिल्हा सदस्य रंगनाथ कलशावकर पंचाकडे संपर्क साधला असता आम्ही स्थानिक उमेदवार गावचा आहे म्हणून त्यांच्यासोबत आहोत लोकल फॉर मिशन हेच उद्दिष्ट असे पंच पालयेकर यांनी सांगितले .

मिशन फॉर लोकल पेडणेकरांचा आवाज ,मिशन फॉर लोकल म्हणजे पेडणेचा स्वाभिमान आणि स्थानिकांचा आवाज आणि स्थानिकांच्या समस्याच स्थानिक आमदारकच सोडवू शकतो अश्या घोषणा सभेत देण्यात येत होत्या .

नोकरीचा राजिमाना (Job resignation) देत राजन कोरगावकर यांनी या अग्निकुंडात उडी घेतली ती पेडणे मतदार संघाचा विकासासाठी असे मत व्यक्त केले.

माजी आमदार (Ex-MLA) विजय कामुलकर यांच्या पत्नी सुकंती कामुलकर यांचा सत्कार करण्यात आला ,तिने मनोगत व्यक्त करताना उशिरा का होईना आमदारांची दखल घेऊन आपला सत्कार केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली .

माजी सरपंच राजू नर्स यांनी बोलताना अमर अकबर अनथोनी हे तीन धर्माचे पंच एकत्रित येऊन स्वाभिमान जागवला ,आम्ही लुटायला देणार नाही , युवा पिढीला पुढे नेण्यासाठी हे मिशन आहे .आम्ही स्वाभिमानी स्थानिक पेडणेकर आहोत म्हणून एकत्रित आलोत,कोरोना काळात लोकांना हात देण्याचे काम केले लोक रडले ,दुखा पुसण्यासाठी राजन पुढे आले.सरकारच्या योजना (Government plans) लोकांपर्यंत पोचवण्याचे काम केले. सरपंच उमा साळगावकर व पंच प्रमिला देसाई यांना बाबूने पोलीस स्टेशनवर नेऊन बसवले ,बाबूने दोन लिटर तेल चतुर्थीला दिले ते एक लिटर तेल आता बांबूच्या पाठीला लावणार. अनपड व गवार हा बाबू आहे असा आरोप नर्स यांनी करून राजन यांनी कुणाला टोप्या नव्हेत खेळगड्याना कॅप दिले असा सांगितले. बाबू ने नव्हे आता पेडणेकरना पेडणेकरच नोकऱ्या देणार ,

अन्यथा मोर्चा दोन पंचना आज पोलिसांनी सोडले नाही तर उद्या पेडणे पोलीस स्टेशनवर (Police Station) मोर्चा नेणार बाबूंना कोरगावात अडवणार कोरगावात बाबू आले तर आता त्यांना अडवून प्रश्न विचारणार लोकांना विनाकारण का त्रास केला म्हणून असे सांगितले . एकच संधी द्या सर्वांनी एकसंघ होऊन एकदाच राजन कोरगावकर यांना संधी देऊन आमदार बनवूया आणि प्रशांसान तुमच्या दारी आणण्याची ग्वाही दिली .

प्रा. सुदन बर्वे

मागची 20 वर्षे आम्ही स्थानिक उमेदवार (Local candidates) शोधत होतो ,बाहेरचे जिंकले मंत्री झाले काम केले ,मात्र आता स्थानिक हवा ,देवाची इच्छा आहे राजन कोरगावकर हाच आमदार होईल.आता लोकल उमेदवार आमच्यासमोर आहे. आता मताद्वारे परिवर्तन करूया.पेडणेकरांचा उमेदवार लोकांनी ठरवला तोच विजयी होणार. सभा संपण्यापूर्वी त्या दोन्ही पंचना सोडावे अन्यथा विपरीत परिणामांना सामोरे जावे लागेल.

उदय पालयेकर यांनी बोलताना लोकांची उपस्थिती पाहिल्यास हीच मंडळी कोरगावकर यांना विजयी करतील आता बाहेरची गुलामगिरी आम्ही करणार नाही असा विश्वास पंच पालयेकर यांनी व्यक्त केला.

प्रशांत शेट्ये यांनी बोलताना पोलिसांची दादागिरी खपवून कोरगावासी घेणार नाही ,मंत्री आजगावकर (Minister Azgavkar) हे अधिकाराचा दुरुपयोग केला ,आज जर दोन्ही पंच सुटले नाही तर आम्ही सकाळी मोर्चा नेणार असा इशारा दिला.

माजी सरपंच पंढरी आरोलकर यांनी बोलताना 2012 पासून आम्ही स्थानिक उमेदवार शोधत होतो आता आमचा उमेदवार आहे,पर्रीकर यांनी सांगितले होते 2022 साली उमेदवार स्थानिक द्या। आणि पर्रीकर यांच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी आता भाजपचे उमेदवारी राजन कोरगावकर यांना देण्याची मागणी केली.

पंच वसंत देसाई यांनी बोलताना जे आमदार (MLA) बाबू आजगावकर यांना जमले नाही ते आता पेडणेकर करून दाखवणार ,अनपड आमदार नको आता सुशिक्षित आमदार हवा.

रोहिदास भाटलेकर, मंगेश थळी, दाजी कासकर,पंच अब्दुल नाईक,गोपाळ शेट्ये, मधू पालयेकर यांची भाषणे झाली.

24 रोजी आयोजित केलेल्या सभेला हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर देवस्थान अध्यक्ष मंगेश स्थळी,राजन कोरगावकर,पंच उदय पालयेकर,पंच कुस्तान कुऍलो,पंच अब्दुल नाईक,पंच वसंत देसाई ,पंच महादेव पालयेकर,राजू नर्स,माजी सरपंच पंढरी आरोलकर,दशरथ गावडे,रोहिदास भाटलेकर उपस्थित होते, रेशमी कोरगावकर,दाजी कासकर , मधुकर गावडे ,कृष्णा गावडे , प्रशांत गावडे, सुदन बर्वे,प्रकाश गावडे आदी उपस्थित होते.

वर्धा नर्स, प्रकाश गावडे, दिलीप मरुडकर, प्राणवी गणपुले,रोशनी हळदणकर,स्नेहल गडेकर,साईशा वेंगुर्लेकर,स्नेहा भाटलेकर आदींनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.वासूदेव शेट्ये यांनी प्रस्थाविक व सूत्रसंचालन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT