भाजप लवकरच गोव्याचा मुख्यमंत्री बदलणार; आपचा घणाघात

मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी मोठा दावा केला आहे की, भाजप लवकरच गोव्यात आपला मुख्यमंत्री बदलणार आहे. गोव्यातील जनता प्रमोद सावंत यांच्यामुळे दु:खी आहे.
Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia
Delhi Deputy Chief Minister Manish SisodiaDainik Gomantak
Published on
Updated on

देशात पाच राज्यांच्या निवडणूकांचे बिगूल वाजू लागले आहे. यातच आता छोट्याशा गोव्यामध्येही (Goa) विधानसभा निवडणूकीची जोरदार तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. सत्ताधारी भाजप गोव्याच्या मतदारांना रिझविण्यासाठी आपल्या कामाचा लेखाजोखा मतदारांच्या समोर मांडत आहे. मात्र भाजप (Bjp) या निवडणूकीच्या पाश्वभूमीवर नेतृत्वबदल करण्याच्या तयारी करत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या विधानसभा निवडणूकीत (Assembly Elections) तृणमूल पक्षाबरोबर (Trinamool Party) आम आदमी पक्षानेही (Aam Aadmi Party) एन्ट्री केली आहे.

दरम्यान, येत्या काही महिन्यांत गोव्यात विधानसभा निवडणुका आहेत. याआधी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia) यांनी मोठा दावा केला आहे की, भाजप लवकरच गोव्यात आपला मुख्यमंत्री बदलणार आहे. गोव्यातील जनता प्रमोद सावंत यांच्यामुळे दु:खी आहे.

Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia
गोव्याचे मुख्यमंत्री अमित शहा यांच्या भेटीला!

मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, भाजप आपला मुख्यमंत्री बदलणार आहे. गोव्यातील जनता प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्यामुळे दु: खी आहे. तेथे प्रमोद सावंत यांनी कोणतेही काम केलेले नाही. भाजपला हे माहीत आहे. यापूर्वी भाजपने गुजरात, उत्तराखंडमध्येही मुख्यमंत्री बदलले आहेत.

मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांच्यात तणाव - सिसोदिया

भाजपने प्रमोद सावंत यांची 10-पॉइंट असलेली फैलियर लिस्ट तयार केली आहे. तसेच सरकार राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळ्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या काळात मात्र राज्यातील पंचायतींनी योग्यरित्या परिस्थिती हाताळली आहे. शिवाय मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यातही मागील काही दिवसांपासून अंतर्गत कलह सुरु आहे. तसेच राज्यात मोठे घोटाळे होत असून भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटण्यात येत असल्याचे देखील यावेळी सिसोदिया यांनी म्हटले आहे.

सिसोदिया पुढे म्हणाले, ''प्रमोद सावंत यांनी कोरोना रिलीफच्या नावाखाली खोटी आश्वासने दिली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत राज्यातील तरुणांना रोजगार देण्यात अपयशी ठरले आहेत. दुसरीकडे खाण माफियांवर कोणत्याही प्रकारची कारवाई अद्याप सरकारकडून करण्यात आलेली नाही. तसेच गोव्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे. खून आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पाणीही महागले आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com