Fuel Leak In Goa: Dainik Gomantak
गोवा

Fuel Leak In Goa: इंधनगळतीच्‍या निषेधार्थ चिखलीत धरणे आंदोलन

Fuel Leak In Goa: कंपनीसह सरकारी अधिकाऱ्यांचा केला निषेध

दैनिक गोमन्तक

Fuel Leak In Goa: व्हडलेभाट, चिखली-दाबोळी परिसरातील लोकांना गेल्या 16 दिवसांपासून इंधनगळतीने ग्रासले आहे. झुआरी इंडियन ऑईल कंपनीच्या भूमिगत इंधनवाहिनीतून ही गळती झाली. त्‍यामुळे त्‍या भागातील विहिरी, नाले व शेतजमीन पूर्णपणे प्रदूषित झाली आहे.

त्‍यातच कंपनीसह मुरगाव तालुका आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे प्रमुख तथा उपजिल्हाधिकारी भगवंत करमली यांनी ग्रामस्‍थांची बाजू समजून घेतली नाही. त्‍याचा निषेध म्‍हणून चिखलीच्या पंचसदस्‍य नीलम नाईक यांच्‍या नेतृत्‍वाखाली ग्रामस्थांनी आज बुधवारी माटवे-चिखली येथे सरकारविरोधात धरणे आंदोलन छेडले.

‘पद्मभूषण’ मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीदिनी हे आंदोलन शांततेत पार पाडले. कंपनीचे अधिकारी व मुरगाव आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे प्रमुख तथा उपजिल्हाधिकारी भगवंत करमली यांनी व्हडलेभाट ग्रामस्‍थांना खालच्‍या दर्जाची वागणूक दिली, असा आरोप पंच नीलम नाईक यांनी केला. जनतेवर अन्याय झाल्‍याने आंदोलन करणे भाग पडले, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

झुआरी इंडियन ऑईल कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आज व्हडलेभाट परिसरातील नागरिकांना प्रदूषित वातावरणात वास्तव्य करावे लागत आहे. यास कंपनीसह मुरगाव आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे अधिकारी जबाबदार आहेत.
- नीलम नाईक, पंचसदस्‍य (चिखली)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT