Mobor coast Dainik Gomantak
गोवा

लग्नाच्या इव्हेंटमध्ये मोबोर किनारपट्टीचा विध्वंस; कासव संवर्धन क्षेत्रात घुसखोरी

दैनिक गोमन्तक

मडगाव Margao : दक्षिण गोव्यातील (South Goa) मोबोर किनारपट्टीवर लीला हॉटेलच्या मागे चालू असलेला तीन दिवसांचा विवाह सोहळा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला असून या इव्हेन्टसाठी शामियाना आणि स्टेज उभारताना सीआरझेड कायद्याचे पूर्णतः उल्लंघन केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तर हा इव्हेंट आयोजित करण्यासाठी आयोजकांनी सर्व परवाने घेतले असल्याचा दावा स्थानिक पंचायतीने केला आहे. खासगी आयोजकांकडून हा विवाह (Marriage) सोहळा कालपासून सुरू झाला असून 9 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यासाठी किनाऱ्यावर भव्य स्टेज उभारण्यात आले असून मंडपही उभारण्यात आले आहेत.

केळशी जैवविविधता समितीचे सदस्य असलेले स्थानिक रॉय बार्रेटो यांनी यासंदर्भात सांगितले, की हा इव्हेंट सीआरझेड क्षेत्रात होत असून या जागेत स्थानिक मच्छीमारांसाठी गरजेच्या वस्तू सोडून अन्य कुठलीही गोष्ट करण्यास कायद्याने मनाई केली आहे.

बार्रेटो यांनी यासंदर्भात एक व्हिडिओही प्रसारित करून आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असून हा व्हिडिओ (Video) सध्या व्हायरल झाला आहे. ज्या जागेत हा इव्हेंट केला जात आहे, ती जागा कासव अंडी घालण्यास येणारी संवेदनशील जागा असून अशा पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या जागेत असे मोठे इव्हेंट करण्यास प्रशासकीय अधिकारी परवानगी कशी काय देतात, असा सवाल बार्रेटो यांनी केला आहे.

केळशी मोबोरचे सरपंच (Sarpanch) डेसमंड डायस यांना यासंदर्भात विचारले असता, या इव्हेन्टला सीआरझेड ऑथोरिटी आणि पर्यटन खाते या दोघांचीही परवानगी आहे. याच परवानगीच्या आधाराने पंचायतीने या इव्हेन्टला परवानगी दिली, असे सांगितले.

सीआरझेड प्राधिकरणाच्या सूचनांनाही हरताळ

सीआरझेड प्राधिकरणाने या इव्हेंटला परवानगी देताना भरती - ओहोटी येणाऱ्या क्षेत्रात (इंटरटायडल) कुठलाही हस्तक्षेप केला जाऊ नये, अशी अट घातली असली तरी हा पूर्ण इव्हेंट इंटरटायडल जागेतच होत असल्याचा दावा बार्रेटो यांनी केला आहे. यासंदर्भात सरकारी अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष प्रदीप सरमोकादम यांच्याशी संपर्क साधला असता, हे प्रकरण सीआरझेड क्षेत्रात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सीझेडएम प्राधिकरणाचे संचालक दशरथ रेडकर यांच्याशी संपर्क साधला असता, यासंदर्भात आमच्याकडे अजून तरी कुणी तक्रार दाखल केलेली नाही, असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

Goa Today's News Live: दक्षिण गोव्यातील स्विगी डिलिव्हरी बॉईज संपावर

Pramod Sawant: दक्षिणेतील काही राज्य हिंदी समजून देखील घेण्याचा प्रयत्न करत नाहीत; गोवा मुख्यमंत्री

एक देश-एक निवडणूक! प्रत्यक्षात येण्याची वाट कमालीची खडतर; संपादकीय

गोव्याच्या लोकसंस्कृतीत 'घुमट वाद्याला' अनन्यसाधारण स्थान का आहे? चर्मवाद्यांच्या विशेष योगदानाबद्द्ल जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT