Illegal Sand Mining Dainik Gomantak
गोवा

Illegal Sand Mining: बेकायदेशीर बांधकामासाठी वाळूच्‍या टेकड्यांचा विद्‌ध्‍वंस

Illegal Sand Mining: सेर्नाभाटी किनाऱ्याची हानी : काम बंद करण्‍याची मागणी

दैनिक गोमन्तक

Illegal Sand Mining: सेर्नाभाटी येथील किनाऱ्यावर बेकायदेशीर बांधकाम उभारले जात असून त्‍यासाठी वाळूच्‍या टेकड्यांचा विध्‍वंस केला गेला आहे, अशी तक्रार कोलवा सिव्‍हीक फोरमच्‍या सचिव आणि पर्यावरण चळवळीतील आघाडीच्‍या कार्यकर्त्या ज्‍युडिथ आल्‍मेदा यांनी गाेवा किनारपट्टी व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाकडे केली आहे.

या प्राधिकरणाने या कामात हस्‍तक्षेप करून ते त्‍वरित बंद करावे, अशी मागणी केली आहे. दरम्‍यान, शनिवारी (ता.११) या भागातील सामाजिक कार्यकर्ते वॉरन आलेमाव यांनी या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. एका हॉटेल व्‍यावसायिकाने आपल्‍या बांधकामासाठी हा विध्‍वंस केला आहे आणि हे बांधकाम करताना या हॉटेल व्‍यावसायिकाने स्‍थानिक पंचायतीलाही अंधारात ठेवल्‍याचे त्यांनी म्‍हटले आहे. या ठिकाणी जेसीबीचा वापर करून सुमारे सात मीटर खोल खणले गेले आहे, असे आलेमाव यांनी सांगितले.

आल्‍मेदा यांनी ज्‍या ठिकाणी हे काम चालू आहे त्‍याची छायाचित्रे आणि व्‍हिडिओ काढून शुक्रवारी (ता.१०) किनारपट्टी व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाच्‍या सदस्‍य सचिवांना पाठविले होते. मडगाव येथील उपविभागीय न्‍यायदंडाधिकाऱ्यांचेही त्‍यांनी या प्रकाराबद्दल लक्ष वेधले होते. हे काम चालू आहे ते पूर्णत: बेकायदेशीर असून पर्यावरणावर विपरित परिणाम करणारे आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घातले नाही तर आपण न्‍यायालयात दाद मागू, असे आल्मेदा यांनी म्‍हटले आहे.

ज्‍या हॉटेल व्‍यावसायिकाने हे बांधकाम केले आहे त्‍याने किनारपट्टी व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाची परवानगी घेतलेली नाही. या व्‍यावसायिकाने किनाऱ्यावर जेसीबी आणण्‍यासाठी बेकायदेशीर रस्‍ता केला आणि नंतर वाळूच्‍या टेकड्या कापल्‍या आहेत. या बेकायदेशीर कामाची प्राधिकरणाने त्‍वरित दखल घेऊन कारवाई करावी.
- वॉरन आलेमाव, सामाजिक कार्यकर्ते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT