Mahadayi River: ‘म्हादई प्रवाह’चे कार्यालय लवकरच गोव्यात

Mahadayi River: केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने स्थापन केलेल्या म्हादई - प्रवाह प्राधिकरणाचे पूर्णवेळ कार्यालय गोव्यात सुरू होत आहे.
Mahadayi Water Dispute
Mahadayi Water DisputeDainik Gomantak
Published on
Updated on

Mahadayi River: केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने स्थापन केलेल्या म्हादई - प्रवाह प्राधिकरणाचे पूर्णवेळ कार्यालय गोव्यात सुरू होत आहे. यासाठी पर्वरी येथील जलस्त्रोत खात्याच्या इमारतीचा तिसरा मजला खाली करण्यात आला असून या ठिकाणी हे प्रवाहाचे कार्यालय उभारण्यात आले आहे. लवकरच ते पूर्णवेळ कार्यालय सुरू होईल, अशी माहिती आहे.

Mahadayi Water Dispute
Crime News: खून प्रकरणातील सुनावणीच्या विलंबामुळे महिलेला जामीन

जलशक्ती मंत्रालयाने या समितीच्या अध्यक्षपदी पी. एम. स्कॉट यांची नियुक्ती केली आहे. या समितीची मुदत तीन महिन्यांची होती. आता ती वाढवली आहे. म्हादई जलतंटा लवादाने २०१८ मध्ये गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांना म्हादईचे पाणी वाटून दिले आहे. याप्रमाणे प्रत्येक राज्य पाणी वापरते की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी ‘म्हादई प्रवाह’ ची घोषणा केली होती. या समितीच्या सचिवपदी अशोककुमार व्ही. तर सदस्यपदी वीरेंद्र शर्मा यांची निवड केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

 Ragada River Turbid Water
Mhadei River Archaeological Heritage
Bombay High Court Goa Bench Casino Order
St Inez creek restoration 6 months
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com