miramar over head bridge demolition  Dainik Gomantak
गोवा

Miramar Over Head Bridge: धोकादायक पूल पाडायला सुरुवात; १० लाखांची तरतूद

Panaji Municipal Council: पूल धोकादायक असल्याने त्वरित पडण्याचा निर्णय पणजी महानगरपालिकेने घेतला असून कामाला सुरुवात करण्यात आली

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मिरामार येथील शारदा विद्यालयासमोर उभारलेला ‘ओव्हर हेड पूल’ धोकादायक परिस्थितीत असल्याने तो त्वरित पडण्याचा निर्णय पणजी महानगरपालिकेने घेतला असून कामाला सुरुवात करण्यात आली.

यासाठी एकूण १० लाख रुपयांची तरतूद केल्याची माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली. शारदा विद्यालयाने विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन सोमवारपर्यंत सुट्टीही जाहीर केली आहे.

सोमवारपर्यंत पूल पाडण्याचे काम पूर्ण होईल, असे कंत्राटदार तसेच महापौर यांनी स्पष्ट केले. मिरामार ते दोनापावल मार्गावरील वाहतूक गोवा विज्ञान केंद्राकडून आतील मार्गावर वळवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.

महापौर म्हणाले, रविवारी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. परंतु उशीर होण्याचीही शक्यता असल्याने सोमवारपर्यंत वेळ आम्ही घेतली आहे. पूल पाडण्याचे काम शुक्रवारी संध्याकाळी सुरू केले आहे. यासाठी पणजी महानगरपालिकेतर्फे १० लाख रुपये खर्च देण्यात येणार असून तशी निविदा जारी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT