Bicholim Road Issue  Dainik Gomantak
गोवा

Bicholim Road Issue: डिचोलीतील खोदलेला रस्ता पूर्ववत करण्याची मागणी

गेल्या अनेक महिन्यांपासून सोनार पेठ-डिचोली येथे भूमिगत वीज केबल रिस्टोरेशन बॉक्स बसविण्याचे काम सुरू आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Road Issue: पावसाळ्यातील धोका कमी करण्यासाठी आणि डिचोली ते मये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सोनार पेठ-डिचोली येथे भूमिगत विजवाहिन्या घालण्यासाठी खोदलेला रस्ता लवकरात लवकर पूर्ववत करावा, अशी मागणी डिचोली व मये येथील रहिवाशांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून सोनार पेठ-डिचोली येथे भूमिगत वीज केबल रिस्टोरेशन बॉक्स बसविण्याचे काम सुरू आहे. येथून हा रस्ता मये येथे जातो. परंतु हा रस्ता अरुंद असून येथून दिवसाकाठी हजारो वाहने ये-जा करत असतात.

यामुळे या रस्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. शिवाय हे काम पावसाळा होण्यापूर्वी संपुष्टात न आल्यास येथील भाग चिखलमय होऊन वाहनचालकांस आणि विशेषता पादचाऱ्यांस बराच त्रास सहन करावा लागणार आहे.

त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना होणारा त्रास टाळण्यासाठी वीज विभागाने हे काम जलदगतीने हाती घेऊन पूर्ण करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईला आम्ही कंटाळलो! 'गोवा काँग्रेस पक्ष' नोंदणी प्रक्रियेसंदर्भात कोर्ट नाराज

VIDEO: वकिलाची गाडी अडवून मारहाण अन् शिवीगाळ, आमदार पुत्राची गुंडगिरी; तक्रारीनंतरही FIR नाही, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल!

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये मृत्यूचं भयानक तांडव! गजबजलेल्या बाजारात अचानक हवाई हल्ला; 49 जणांचा मृत्यू; 58 जखमी, थरारक VIDEO समोर

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

SCROLL FOR NEXT