Goa Crime: बार्देशात मालमत्ता वादातून सातजणांना अटक

काणका-बस्तोडात हाणामारी : एकाच कुटुंबातील सदस्य आपापसांत भिडले; रस्त्यावर गोंधळ
 Crime News | Goa News
Crime News | Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

Crime News मालमत्तेच्या वादातून बार्देश तालुक्यातील डिमेलोवाडा-काणका आणि बस्तोडा येथे दोन ठिकाणी झालेल्या हाणामारीत एकाच कुटुंबातील सदस्य आपापसांत भिडले. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी सातजणांना अटक केली आहे.

बार्देशात बुधवारी (ता.7) रात्री एकाच कुटुंबातील दोन गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी सातजणांविरुद्ध गुन्हा नोंदवून एकूण पाचजणांना अटक केली व या सर्वांना एका दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली.

 Crime News | Goa News
CM On Migrant Workers: गोव्यातील गुन्ह्यात परप्रांतीयांचाच हात; मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

संशयित ताज मोहम्मद शेख (५०), फैजल शैख (२९), जहिद शेख (३३), फैजान शेख (२८), अमीन शेख (४६) अशी अटक केलेल्यांची नावे असून हे सर्वजण डिमेलोवाडा-काणका येथील रहिवासी आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी रात्री ११.१२ वा.च्या सुमारास घडली. यावेळी डिमेलोवाडा येथे आपल्या घराबाहेरील रस्त्यावर पहिल्या गटातील संशयित ताज शेख, फैजल शेख, हिना शेख, नीता नाईक व त्यांचे सहकारी आणि दुसऱ्या गटातील जहिद शेख, फैजान शेख, अमीन शेख व त्यांचे सहकारी हातात शस्त्रे घेऊन जमले.

 Crime News | Goa News
Pre-Monsoon in Goa: प्रतीक्षा ‘मिरगा’च्या पावसाची

यावेळी संशयितांनी सार्वजनिक रस्ता वापरून प्रवाशांना प्रतिबंधित केले. ज्यामुळे डिमेलोवाडो परिसरातील शांतता भंग झाली. तसेच तक्रारदार व इतर पोलिस कर्मचाऱ्यांना कायदेशीर कर्तव्ये पार पाडण्यापासून परावृत्त केले.

याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयितांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या १६०, १४३, १४७, १४८, ३४१, ५०४, ३२३, ३२४, ४२७, ५०६(२), ३३६, ३५३ व १४९ कलमांन्वये गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल युस्ताकियो फर्नांडिस हे तक्रारदार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com