Goa Feast Dainik Gomantak
गोवा

Goa Feast: फेस्त फेरी स्थगितीचा आदेश देण्याची मागणी

फेस्तासाठीची फेरी नावेली येथील परपेच्युअल सुकोर कॉन्व्हेंट हायस्कूलच्या अगदी जवळ भरली जाते.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: फेस्तासाठीची फेरी नावेली येथील परपेच्युअल सुकोर कॉन्व्हेंट हायस्कूलच्या अगदी जवळ भरली जाते. त्यामुळे या फेस्त फेरीचा परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने हायस्कूलच्या पालक-शिक्षक संघाने दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या फेस्त फेरीवर स्थगिती आदेश जारी करण्याची मागणी केली आहे.

(Demand for order of postponement of fest round )

पालक-शिक्षक संघाने नावेली पंचायतीलाही पत्र लिहून फेस्त फेरीसंदर्भात निर्णय घेण्यास सांगितले आहे.

नावेली येथील अवर लेडी ऑफ रोझरी चर्चचे फेस्त 16 नोव्हेंबर रोजी साजरे करण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षा गुरुवार, 10 रोजीपासून सुरू होऊन 26 रोजी संपणार आहेत.

नावेलीचे सरपंच पॉल परेरा यांनी या संदर्भात चर्चा करण्यासाठी पंचायतीची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये असे आमचेही मत असल्याचे सांगितले.

पत्रातून केले स्पष्ट...

फेस्त 16 तारखेला असले तरी फेस्त फेरी कमीत कमी आठ ते दहा दिवस असते. त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग होऊ शकते. फेस्त फेरीसाठी ही जागा बदलून दुसरी शाळेपासून दूर जागा शोधावी, असे या शाळेच्या पालक-शिक्षक संघाने जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT