पणजी: डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर कालपासून सुरू असलेल्या रोजगार मेळाव्यात राज्यभरातील युवकांनी सहभाग घेतला. याला संमिश्र प्रतिसाद लाभला. 10 हजारांहून अधिक गोमंतकीय युवकांनी आपल्या हाताला काम मिळेल या आशेने दिडशेहून अधिक कंपन्या असलेल्या या रोजगार मेळाव्याला आवर्जून हजेरी लावली.
(Goa Mega Job Fair)
त्यातील 500 युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आल्याचे कामगार आयुक्तांनी म्हटले आहे तर 4800 उमेदवारांची नियुक्ती होण्याचा मार्गावर आहे.
ऑटोमोबाइल, आयटी, हॉटेल व्यवस्थापन, विमान सेवा, बॅंकिंग अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला. एकंदरीत एकूण किती उमेदवारांना नोकऱ्या मिळणार, हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहे. यात सहभागी कंपन्या आणि युवकांच्या आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्या खालीलप्रमाणे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.