Socorro Residents Dainik Gomantak
गोवा

Socorro: अधिसूचित जंगलामध्ये बांधला रस्ता! 'सुकूर' येथील घटना; संतप्त स्थानिकांचा पंचायतीत ठिय्या

Socorro News: सुकूर येथे अधिसूचित वनक्षेत्रात बांधलेल्या बेकायदेशीर रस्त्याच्या बांधकामाबाबत चिंता व्यक्त करत, राज्यातील विविध भागांतील लोकांसह स्थानिक रहिवासी पंचायतीमध्ये जमले व त्यांनी कारवाईची मागणी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Locals Demand Crackdown on Illegal Road Built in Socorro Forest

म्हापसा : सुकूर येथे अधिसूचित वनक्षेत्रात बांधलेल्या बेकायदेशीर रस्त्याच्या बांधकामाबाबत चिंता व्यक्त करत, राज्यातील विविध भागांतील लोकांसह स्थानिक रहिवासी आज सोमवारी पंचायतीमध्ये जमले व त्यांनी कारवाईची मागणी केली. तसेच ही जमीन पूर्ववत करण्याची मागणी केली. त्यानंतर, स्थानिकांनी सुकूर सरपंचासह अधिसूचित वनक्षेत्रातील कोमुनिदाद जमिनीवर कोणतीही परवानगी न घेता, बांधलेल्या अवैध बांधकामाची पाहणी केली.

सुकूर पंचायतीच्या सरपंचा सोनिया पेडणेकर यांनी सांगितले की, पाहणी अहवाल पंचायत मंडळाच्या बैठकीसमोर ठेवला जाईल व आवश्यक ती कारवाई केली जाईल.

प्राप्त माहितीनुसार, सुकूर गावातील सर्व्हे क्रमांक २९१ व २०७मध्ये काही अज्ञात व्यक्तीने बेकायदेशीर काम केले असून रस्ता बांधणीचे काम कोणत्याही परवानगीशिवाय केले जात आहे. जॉन वाझ यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक ग्रामस्थांनी या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे. आणि मुख्य वनसंरक्षक, बार्देश उपजिल्हाधिकारी, साबांखा कार्यकारी अभियंता, उपनगर नियोजक व सुकूर पंचायत यासह विविध अधिकार्‍यांकडे लेखी तक्रारी करुन पाहणीची मागणी केली आहे. तसेच जमीन त्याच्या मूळ स्थितीत आणावी असेही या तक्रारीत म्हटले आहे.

सोमवारी (ता.२१) सुकूर पंचायतीच्या सोनिया पेडणेकर यांनी पंचायत सचिव व स्थानिक पंचायत सदस्य यांच्यासह राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने आलेल्या लोकांच्या उपस्थितीत जागेची पाहणी केली. या लोकांनी स्थानिक रहिवाशांना या समस्येवर पाठिंबा दर्शविला.

बेकायदेशीर रस्त्याच्या बांधकामामुळे, शेजारील दोन मालमत्तांच्या संरक्षक भितींचे कसे नुकसान झाले हे पाहणीदरम्यान स्थानिकांनी पंचायतीच्या निदर्शनास आणले. रस्त्याच्या बांधकामामुळे पर्यावरणारवर होणाऱ्या परिणामांबद्दल स्थानिकांनी चिंता व्यक्त केली. कारण रस्त्याच्या कडेला मातीची धूप होत आहे. परिणामी, झाडांची मुळे उघडी पडल्याने भविष्यात भूस्खलन होऊ शकते. तसेही सुकूर येथील हा परिसर वनक्षेत्र अधिसूचित आहे.

वाझ म्हणाले की, पुन्हा काही अज्ञात व्यक्तींनी बेकायदेशीरपणे हा रस्ता बांधला असून संबंधितांवर कारवाई करून जमीन मूळ स्थितीत आणावी, अशी आमची मागणी आहे. दरम्यान, पूर्वी या परिसरातून एक मार्ग जात असल्याचा दावा केला जात होता. मात्र, आता कथित अवैध बांधकामामुळे रस्त्याची रुंदी वाढली असून भविष्यात हाच मार्ग प्रवेश म्हणून वापरला जाण्याची भीती स्थानिकांना आहे.

जंगल टिकवण्यासाठी दहा वर्षे लढा

जॉन वाझ यांनी सांगितले की, सेरुला कोमुनिदादच्या सुकूर येथील अधिसूचित वनक्षेत्रात रस्त्यांच्या बेकायदेशीर बांधकामाबाबत विविध अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. हा परिसर अधिसूचित जंगल असून, तो टिकवण्यासाठी आम्ही २०१४पासून लढा देत आहोत, अशी माहिती त्यांनी पुढे दिली. २०१४मध्ये ५३ झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यात आली होती. २०१५मध्ये पंचायतीने डांबरी रस्त्याचा प्रस्ताव दिला होता, त्याला आम्ही आक्षेप घेतला आणि तो ठराव रद्द करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aldona: संतापजनक! हळदोण्यात पाळीव कुत्र्याच्या जबड्यावर झाडली गोळी; स्थानिकांची कारवाईची मागणी

Raibandar Fire News: रायबंदरमध्ये आगीचे थैमान! 2 दुचाकी, 4 कार जाळून खाक; लाखोंचे नुकसान

Verca Fire News: वार्का 2 स्कूटरींक उजो, Video

Mhadei River: कर्नाटकचे पितळ उघडे! खोट्या माहितीद्वारे घेतले जागतिक बँकेचे कर्ज! 'म्‍हादई'प्रश्‍नी गोवा सरकार देणार पुरावे

Mhaje Ghar: एक कार्यक्रम, 173 बैठका! ‘माझे घर’साठी भाजपने केले सूक्ष्म नियोजन; लाभार्थ्यांपर्यंत अर्जांसह पोहोचणार कार्यकर्ते

SCROLL FOR NEXT