डेल्टीन कारावेला कॅसिनो सीआरझेड परवाना मिळेपर्यंत काम थांबवण्याचे हरित लवादाने आदेश गेल्या महिन्या अखेर दिले होते. CRZ परवाना नसताना पर्यावरणाची हानी केल्याचे कारण देत प्रदुषण नियंत्रण मंडळाने डेल्टीनकडून नुकसान भरपाई वसूल करावी अशी हरित लवादाने मागणी केली होती. पण हरित लवादाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने कॅसिनो पुन्हा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे.
डेल्टीन कारावेला कॅसिनो थांबवण्यासाठी हरित लवादाने काय घेतली होती भुमिका ?
मांडवीतील कॅसिनोंना सीआरझेडसा परवाना आवश्यक होते.यासाठी डेल्टीन कारावेला कॅसिनो सीआरझेड परवाना मिळेपर्यंत काम थांबवण्याचे ग्रीन ट्रीब्यूनलने आदेश दिले होते. CRZ परवाना नसताना पर्यावरणाची हानी केल्यामुळे प्रदुषण नियंत्रण मंडळाने डेल्टीनकडून नुकसान भरपाई वसूल करावी अशी एनजीटीने मागणी केली जात होती.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) कॅसिनो आणि फ्लोटेल डेल्टिन कारावेला मांडवी नदी, गोव्यावर तात्काळ प्रभावाने कोस्टल रेग्युलेटरी झोन (CRZ) मंजुरी मिळाल्याशिवाय त्यांचे पुढील काम करण्यास प्रतिबंधित केला होता.
NGT ने गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला (GSPCB) प्रकल्प प्रस्तावकांच्या ऑपरेशन्सच्या कारणास्तव आवश्यक CRZ मंजुरीसह पर्यावरणाच्या नुकसानीचे मूल्यांकन आणि नुकसानभरपाई वसूल करण्याचे निर्देश दिले होते. याबाबत एनजीटीने सांगितले होते. की पैसे वसूल झाल्यानंतर, कायद्याच्या योग्य प्रक्रियेनंतर, कृती आराखडा तयार करून पर्यावरण पुनर्संचयित करण्यासाठी त्याचा वापर केला जाईल अशी भुमिका घेतली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.