कोलवा किनाऱ्याच्या सौंदर्याला 'गालबोट'

उड्डाण पुलाची दैन्यावस्था: जलपर्णींमुळे खाडीचे अस्तित्व धोक्यात
Colva Beach
Colva BeachDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असलेल्या गोव्याच्या नावलौकिकामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कोलवा किनाऱ्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. इथल्या अनेक साधनसुविधा मोडकळीस आल्या असून किनाऱ्याकडे जाणाऱ्या उड्डाण पुलांची अवस्था धोकादायक बनली आहे. त्यामुळे जगभरातल्या पर्यटकांची पहिली पसंती असणाऱ्या कोलवा किनाऱ्याच्या सौंदर्याला सध्या बाधा आली आहे.

जगप्रसिध्द कोलवा किनाऱ्यावर पर्यटन हंगामात देश- विदेशातील पर्यटकांची गर्दी उसळते. या किनाऱ्याकडे जाण्यासाठी बांधलेल्या पुलाचे कठडे पडून लोखंडी सळ्या बाहेर पडल्या आहेत. तसेच या उड्डाण पुलावर जागोजागी खड्डेही पडले आहेत. येथे येणारे पर्यटक आणि पुलावर उभे राहून सेल्फी घेणाऱ्यांसाठी या सळ्या धोकादायक ठरत आहेत.

Colva Beach
सावधान...! गोव्यात कोरोना वाढतोय

विदेशी पर्यटकांचे आवडते ठिकाण: आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल एजन्सींनी जगातल्या सुंदर किनाऱ्यांमध्ये कोलवा किनाऱ्याची गणना केली आहे. रूपेरी वाळू आणि लांब पल्ला या दृष्टीकोनातून तमिळनाडूतील मरिना समुद्र किनारा हा देशातील क्रमांक एक तर कोलवा किनाऱ्याचा दुसरा क्रमांक लागतो.

खाडी लुप्त होण्याचा धोका

येथील कोलवा खाडीची कथा तर न संपणारीच आहे. स्थानिक स्वराज्य संस्था वा सरकारी यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे सध्या ही खाडी कचऱ्याने व सांडपाण्याने भरून गेली आहे. तशातच पाणवनस्पतींनी तेथे बस्तान बसविले आहे. ती पाणवनस्पती न हटविल्यास खाडीच लुप्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळी येथे संपूर्ण काळोख असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com