delta corp Casino Dainik Gomantak
गोवा

Delta Corp Share : कॅसिनोंवर कर वाढला; शेअर्स गडगडले

एकाएकी परिणाम : ‘डेल्टा कॉर्प’ला एकाच दिवसात तब्बल 1500 कोटींचा तोटा

दैनिक गोमन्तक

Delta Corp Casino : कॅसिनोंवरील जीएसटी 18वरून 28 करण्‍यात आल्‍यामुळे देशातील सर्वांत मोठी कॅसिनो कंपनी असलेल्या ‘डेल्टा कॉर्प’वर मोठा परिणाम झाला. या कंपनीचा शेअर 246 वरून 190 रुपये एवढा खाली आल्याने एकाच दिवसात या कंपनीला 1500 कोटींचा फटका बसला. हे नुकसान सुरू वर्षात आलेल्या एकूण महसुलापेक्षा (1021 कोटी) अधिक आहे.

दुसरीकडे या कंपनीने यापूर्वी जीएसटी बुडविल्याने जीएसटी आयुक्तांनी त्यांच्या गोव्यातील कार्यालयावर धाड घातली होती. गोव्यात सध्या ५ ऑफशोअर कॅसिनो आहेत. त्‍यांच्‍याही

शेअर्सवर परिणाम होऊ शकतो. कॅसिनो आणि ऑनलाईन गेमिंगच्या संपूर्ण दर्शनी मूल्यावर २८ टक्के एकसमान दराने जीएसटी आकारण्याची शिफारस जीएसटी परिषदेच्या ५०व्या बैठकीत करण्यात आली आहे. हा कर सर्वाधिक असल्याने त्‍यावर विचार करण्यासाठी मंत्री गटाची स्थापना करण्यात आली होती. या गटाने ४७व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत आपला अहवाल दिला होता.

मात्र, त्यावर एकमत न झाल्याने पुनर्विचार व्हावा, अशी मागणी होती. या मंत्रिगटाने आपला नवा अहवाल सादर केला. त्‍यातही २८ टक्के जीएसटीची तरतूद करण्यात आली आहे. याचा राज्यातील कॅसिनो उद्योगावर विपरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पर्यटनावर विपरित परिणाम शक्‍य ः माविन गुदिन्हो

  1. कॅसिनोंवर वाढविलेल्‍या जीएसटीमुळे राज्याच्या पर्यटनावर विपरित परिणाम होईल, अशी भीती उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केली. पर्यटनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कॅसिनोंमधील आर्थिक व्यवहारावर आता १८ टक्क्यांऐवजी २८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे.

    याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा झाली असून, लवकरच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेण्यात येईल, असे गुदिन्‍हो यांनी सांगितले.

2. कॅसिनो आणि ऑनलाईन गेमिंगच्या संपूर्ण दर्शनी मूल्यावर २८ टक्के एकसमान दराने जीएसटी आकारण्याची शिफारस जीएसटी परिषदेच्या ५०व्या बैठकीत करण्यात आली आहे. हा कर सर्वाधिक असल्याने त्‍यावर विचार करण्यासाठी मंत्री गटाची स्थापना करण्यात आली होती.

या गटाने ४७व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत आपला अहवाल दिला होता. मात्र त्यावर एकमत न झाल्याने पुनर्विचार व्हावा अशी मागणी होती. या मंत्रिगटाने आपला नवा अहवाल सादर केला.

जीएसटी परिषद बैठकीतील शिफारशी

  • ऑनलाईन गेमिंग, हॉर्स रेसिंग यांचा अनुसूची ३ मध्ये करपात्र योग्य दावे म्हणून समावेश करण्यासाठी कायद्यात योग्य दुरुस्ती केली जाईल.

  • कॅसिनो, हॉर्स रेसिंग आणि ऑनलाईन गेमिंग या तिन्हींवर २८ टक्के या एकसमान दराने कर आकारला जाईल.

  • कॅसिनोंच्या बाबतीत खरेदी केलेल्या चिप्सच्या दर्शनी मूल्यावर, घोड्यांच्या शर्यतीच्या बाबतीत बुकमेकर/टोटलायझेटर बरोबर लावलेल्या पैजांच्या पूर्ण मूल्यावर आणि ऑनलानई गेमिंगच्या बाबतीत पैज लावलेल्या संपूर्ण मूल्यावर कर लागू होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

Sheikh Hasina Press Conference: 'मी जेल आणि मृत्यूला घाबरत नाही!', शेख हसीना यांचा मायदेशी परतण्याचा थेट इशारा; भारतातील पत्रकार परिषदेने उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT