breast cancer in goa Dainik Gomantak
गोवा

स्तन कर्करोग तपासणी शिबिर होणार गावोगावी: दिलायला लोबो

महिलांच्या आरोग्‍याला प्राधान्‍य; कळंगुट मतदारसंघात उपक्रम

दैनिक गोमन्तक

म्हापसा: शिवोली मतदारसंघात गावोगावी महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी शिबिरे आयोजित केली जातील, जेणेकरून महिलांना त्यांचा व्यापक स्तरावर लाभ घेता येईल. कळंगुट मतदारसंघातही असे उपक्रम राबवण्यात येतील, असे उद्‍गार वेर्ला येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी काढले.

गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या महिला विभागाने वेर्ला येथील आध्या महिला मंडळाच्या सहकार्याने ‘स्वस्‍थ्‍य महिला, स्वस्‍थ्‍य गोवा’ उपक्रमाअंतर्गत ‘आय ब्रेस्ट एक्झाम’च्या माध्यमातून स्तन कर्करोग तपासणी शिबिरात प्रमुख पाहुण्या या नात्याने लोबो बोलत होत्या.

एसबीआय फाऊंडेशन, युवराज सिंग फाऊंडेशन आणि गोवा सरकारच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर नाईकवाडा-वेर्ला येथील ब्रह्मकुमारीज संस्थेच्या होली पॅलेस या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने हा उपक्रम पार पडला. सन्माननीय अतिथी प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या गोवा-सिंधुदुर्ग प्रमुख ब्रह्मकुमारी शोभा बेहनजी, म्हापसा केंद्रप्रमुख ब्रह्मकुमारी ममता बेहनजी यांची उपस्थिती होती. आध्या महिला मंडळाच्या अध्यक्ष प्रीती आगरवाडेकर, गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या महिला विभागाच्या निमंत्रक उज्ज्वला फडके यांच्‍यासह डॉक्टरांचे पथकही यावेळी उपस्थित होते. या शिबिराचा १०४ महिलांनी लाभ घेतला.

महिलांनी स्‍वत:चे आरोग्‍य सांभाळावे

महिलांनी स्‍वत:च्‍या ‍आरोग्‍याबाबत परीक्षण करणे आवश्यक आहे. आम्ही महिला स्वत:च्या कुटुंबांचे आधारस्तंभ आहोत आणि जर या संदर्भात स्वत:चीच काळजी घेतली नाही तर संपूर्ण घरच डळमळीत होऊ शकते. ईश्वराने आम्हा महिलांना सुंदर शरीर दिले असून, आम्ही त्याचे परिपोषण करायला हवे. अशा मोफत शिबिराचा प्रत्येकाने लाभ घ्यावा व इतर महिलांनीही त्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे; कारण स्वत:च्या स्वास्थ्याबाबत असे करणे महत्त्वाचे आहे, असे दिलायला लोबो म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT